• Download App
    चांदीचे अल्प सेवन आरोग्यासाठी फार चांगले|A small intake of silver is very good for health

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चांदीचे अल्प सेवन आरोग्यासाठी फार चांगले

    आपल्याकडे चांदी प्रामुख्याने दागिण्यासाठी त्याचप्रमाणे कारखान्यात वापरली जाते. मात्र शरीरासाठीदेखील चांदी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरत असल्याचे नवनव्या संशोधनाअंती समोर येत आहे. त्यामुळेच चांदीचा वर्ख खाण्याची पद्धत आहे. मेवामिठाई, पान, सुपारी इ. वरती चांदीचा अतिशय पातळ वर्ख पसरलेला असतो. तो अन्नाबरोबर पोटात जातो. पचन होत असताना चांदीच्या वर्खाचे रुपांतर बारीक बारीक कणांमध्ये होते. ते कण आपल्या पोटातील मारक जीवाणूंना घातक ठरत असणार.A small intake of silver is very good for health

    चांदीच्या पेल्यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी प्यावे असे उष:पान पद्धतीत म्हटले आहे. हे पाणी निर्जंतुक होते असे मानतात. सध्या प्रचलित असलेल्या घरगुती वापराच्या जलशुद्धीकरण यंत्रातही चांदीच्या नॅनोकणांचा वापर केलेला असतो. यंत्रात टाकलेले पाणी चांदीच्या नॅनोकणांचा शिडकावा केलेल्या कोळशाच्या भुकटीवरून सोडले की पुरेसे होते. निसर्गात नदीच्या निर्मळ पाण्यात ०.३ ते १ अब्जांश भाग इतकी चांदी विरघळलेल्या स्वरूपात असते.

    पादपप्लवक या वनस्पतीत १ ते १० लक्षांश भाग चांदी असते तर कालव या प्राण्यात ८९ लक्षांश भाग इतके चांदीचे प्रमाण असल्याचे आढळून येते. काही वैज्ञानिकांच्या मते चांदीच्या अणुंपेक्षा चांदीच्या आयनांची कार्यक्षमता कित्येक पटीने अधिक आहे. चांदीच्या आयनांचे पाण्यातील प्रमाण १५ मायक्रोग्रॅम प्रतिलीटर इतके असले तरी ते पाणी जंतुविरहीत असू शकते. मात्र याच्यापेक्षा कमी प्रमाणात चांदी असेल तर अशा पाण्यात सूक्ष्मजीव मरण्याऐवजी जोमाने वाढतात.

    चांदीची मात्रा बरीच जास्त झाली तर त्याचे दुष्परिणाम सूक्ष्मजीवांप्रमाणेच वनस्पतींवरही होतात. याबाबत डरहॅम एन सी, येथील ड्यूक विद्यापीठाने संशोधन केले, त्यात त्यांनी चांदीचे नॅनोकण असणारे पाणी एकदाच घातले. पन्नास दिवसांनी मोजून पाहिले असता गवत सरासरीपेक्षा ६६ टक्केच वाढल्याचे आढळले. मानवी शरीरात २ मिलिग्रॅम इतकी चांदी असते. आपल्या आहारातून रोज २० ते ८० मायक्रोग्रॅम चांदीचे सेवन पुरेसे असते.

    उकळून गार केलेल्या पाण्यात चांदीचा चमचा ठेवला तर प्रति लीटर ३७ ते ४० मायक्रोग्रॅम इतकी चांदी त्यात विरघळते. ती अणुकणांच्या आकारात असल्याने क्रियाशील असते. पाण्यातील रोगकारक जंतूना ती मारक ठरते.

    A small intake of silver is very good for health

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!