विशेष प्रतिनिधी
पुणे : आईचे प्रेमसंबंध समजल्याने चिडून एका मुलीने तिला अद्दल घडविण्यासाठी तिच्या प्रियकाराकडे १५ लाखांची खंडणी मागितली यासाठी मुलीने आईचंच व्हाट्सअप हॅक केले. A ransom of Rs 15 lakh was demanded from the mother’s lover, girls action to teach lesson
मिथुन मोहन गायकवाड (वय २९) आणि करण खुडे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे ओळखीतील महिलेशी प्रेम संबंध होते. या महिलेच्या मुलीला याबाबत संशय आला होता. तिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आईचे व्हाट्सअपच हॅक केले. त्यावेळी तिला तक्रारदार व त्यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत समजले. तिने व्हॉट्सऍपद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ देखील मिळविले.
या मुलीने आईला अद्दल घडवण्यासाठी तिच्या मित्राला हे फोटो पाठवले. त्यानंतर हा खंडणीचा प्रकार सुरू झाला.
आरोपींनी तक्रारदार याला मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ दाखविले व ते तुझ्या कुटुंबाला दाखवू अशी धमकी दिली. सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. खंडणी विरोधी पथक एकच्या टीमने आरोपींना मध्यवस्तीत तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. दोघांना अटक केली आहे.
A ransom of Rs 15 lakh was demanded from the mother’s lover, girls action to teach lesson
महत्त्वाच्या बातम्या
- जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सीबीआयचे दिल्ली,पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे
- सुब्रमण्यम यांचे पीएम मोदींना पत्र, हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील विलंबामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे
- कोरोना हाताळण्यात अपयश, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देणार राजीनामा