• Download App
    1992 - 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!|A government that has been in power for 25 years is in danger in 2.5 years

    1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!

    शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेत फूट पाडून शिवसेनेचे 18 आमदार फोडले होते. त्यावेळी त्या आमदारांचे नेतृत्व शरद पवार छगन भुजबळ यांच्याकडे होते 30 वर्षानंतर 2022 मध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि तेही ठाकरे घराण्याचे वारस उद्धव ठाकरे हे स्वतः नेतृत्व करत असताना पुन्हा एकदा शिवसेनाच फुटली आहे.A government that has been in power for 25 years is in danger in 2.5 years

    शिवसेनेचे 1992 मध्ये 18 आमदार फुटले होते. त्यापैकी 6 आमदार परत आले होते. पण आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तब्बल 29 आमदार फुटल्याची बातमी आली आहे. यामागे पवार नावाचा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरला आहे.



    एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित प्लॅन होता आणि तो राज्यसभा निवडणुकीनंतरच अमलात आणायचा होता. परंतु तो विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी अमलात आणला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

    मात्र या सगळ्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर काहीही घडले तरी एक बाब अधोरेखित होताना दिसते, ती म्हणजे ज्या संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भरवशावर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांचे सरकार 25 वर्षे चालवण्याच्या वल्गना केल्या होत्या. ते मात्र 2.5 वर्षात कोसळताना दिसत आहे.

    – राष्ट्रवादीचे भांडवलीकरण पूर्ण

    याचा दुसरा अर्थ असा की राष्ट्रवादीचे या सरकार मधून जे करून घ्यायचे होते ते राजकीय भांडवलीकरण करून पूर्ण झाले आहे. अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस नेते आपल्या आमदारांना भरपूर निधी देऊन त्यांना फंडिंग व्यवस्थित केले आहे शिवसेना आणि काँग्रेस यांच्या आमदारांना निधीसाठी तरसत ठेवले आहे. त्यानंतर बाकीच्यांनी त्यांना जे बघायचे ते बघून घ्यावे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतली होती. ती आजच्या घडामोडींच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने अधोरेखित होत आहे.

    – पवारांनी फोडली होती शिवसेना

    शिवसेनेचा 1992मध्ये शिवसेना विरोधी पक्षात होती. सुधाकरराव नाईक आणि त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणे त्यावेळी शक्य झाले परंतु आता मात्र शिवसेना महाविकास आघाडी सत्तेवर आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत तरी देखील शिवसेना फुटणे ही पक्षासाठी प्रचंड मोठी नामुष्की आहे की राजकीय वस्तुस्थिती लपत नाही.

    A government that has been in power for 25 years is in danger in 2.5 years

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!