• Download App
    बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश ; पोलिसात गुन्हा A gang of five people making fake property document exposed in Solapur; Crime in the police

    बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश ; पोलिसात गुन्हा

    वृत्तसंस्था

    सोलापूर : बनावट मिळकतपत्र बनविणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा सोलापुरात पर्दाफाश करण्यात यश आले असून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये नगरभूमापन कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांसह पाचजणांचा या टोळीत समावेश आहे. A gang of five people making fake property document exposed in Solapur; Crime in the police

    विश्वनाथ हिरालाल भांडेकर, मल्लीनाथ बसप्पा तोटद (कर्मचारी), मल्लीनाथ हणमंतराव अयलेर, अनिरुद्ध ज्ञानेश्वर निरगुडे, राजू महादेवसा बिद्री (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

    सोलापूर येथील नगरभूमापन कार्यालयात विश्वनाथ हिरालाल भांडेकर हे शिरस्तेदार तर मल्लीनाथ बसप्पा तोटद हे शिपाई आहेत. या दोघांनी मिळकतदार मल्लीनाथ अयलेर, अनिरुद्ध निरगुडे, राजू बिद्री यांच्याशी संगनमत करून शासकीय दस्तऐवजांत बनावट नोंदी केल्याचे उघड झाले आहे.

    मिळकतपत्रात खाडाखोड करून मिळकतदारांची नवीन मिळकतपत्रे तयार केली. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नगरभूमापन अधिकारी किरण अशोक कांगणे यांनी सदर बाजार ठाण्यात फिर्याद दिली. या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.दरम्यान, या प्रकरणातील शिरस्तेदार विश्वनाथ भांडेकर यांची पुण्यातील कार्यालयात नुकतीच बदली झाली आहे. फौजदार तोटदार तपास करीत आहेत.

    A gang of five people making fake property document exposed in Solapur; Crime in the police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…