• Download App
    गगनचुंबी इमारतीतच झाडांचे जंगल A forest of trees in a skyscraper

    गगनचुंबी इमारतीतच झाडांचे जंगल

    शहरात आता सर्वत्र इमारतीच इमारती पहायला मिळतात. त्यांना क्रांक्रिटचे जंगल असेही म्हटले जाते. झाडे व वनराई नसल्याने शहरात श्वास घुसमटल्यासारखा भास होतो. त्यात वाहनांची मोठी संख्या असल्यास प्रदूषणात जादाची भर पडते. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ व ताजी हवा मिळणे हे देखील कमालीचे दुरापास्त झाले आहे. चीनमध्ये तर ही समस्या अधिकाअधिक उग्र बनत चालली आहे. जगातील सगळ्यात प्रदूषित शहरांच्या यादीतही चीन आहे. A forest of trees in a skyscraper

    बिंजीग हे शहर तर सगळ्यात प्रदूषित शहर बनलं आहे. लोकांना मोकळा श्वासही घेता येत नाही. झाडं तर या परिसरात नाहीच. आता झाडं लावायचीच झालीच तर त्यालाही जागा उरलेली नाही. म्हणूनच चीन आता क्राँकिंटच्या जंगलातच हिरवे जंगल उभारण्याच्या बेतात आहेत.

    प्रदूषण कमी व्हावे, लोकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी आता चीन नव्या प्रकल्पावर काम करत आहे.

    चीनमधल्या नानजिंगमध्ये व्हर्टिकल फॉरेस्ट्स उभारण्याचा एक प्रयोग सुरू आहे. २०१८ पर्यंत हा प्रयोग पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट स्टेफनो बोइरी यांच्या कल्पनेतून ही वनराई फुलविली जात आहे. चीनमध्ये मोठ मोठ्या अनेक इमारती आहेत. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास २५ स्थानिक प्रजांतीची झाडे लावण्यात येणार आहे. यामुळे ६० किलोग्रॅमपर्यंत ऑक्सिजन तयार होऊ शकतो.

    याआधी इटलीमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता. तेथे तो चांगल्याच यशस्वी झला आहे. त्यामुळे रुक्ष वाटणाऱ्या गगनचुंबी इमारती आता खऱ्या खुऱ्या हिरव्यागार झाडांमुळे अधिक सचेत बनणार आहेत. येथे लोकांना आपण घरात आहोत की बागेत हे कळणारही नाही अशी परिस्थीती यामुळे निर्माण होणार आहे. त्याचा लोकांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थासाठी बहुमोल उपयोग होणार आहे.

    A forest of trees in a skyscraper

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!