देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वात मृत्यू. महाराष्ट्राने आजच ६० लाख रुग्णांचा गाठला आणि एकूण ७५ हजार मृत्यूही नोंदविले गेले. तरीही केंद्राला कोरोनाविरुध्द कसे लढायचे हे महाराष्ट्राकडून शिका असे म्हणणाºया प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांना नेटकऱ्यांनी धू धू धुतले. 60 lakh patients, 75,000 deaths, but the center is called Learn from Maharashtra, Javed Akhtar trolled by netizens
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वात मृत्यू. महाराष्ट्राने आजच ६० लाख रुग्णांचा गाठला आणि एकूण ७५ हजार मृत्यूही नोंदविले गेले. तरीही केंद्राला कोरोनाविरुध्द कसे लढायचे हे महाराष्ट्राकडून शिका असे म्हणणाºया प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांना नेटकऱ्यांनी धू धू धुतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आणि त्यांचे हे ट्विट व्हायरल झाले. या ट्विटरमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत, केंद्राला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. तरी देखील सरकार आणि बीएमसी जबरदस्त क्षमतेने काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे, अशा आशयाचे ट्विट करत जावेद अख्तर यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले.
मात्र, त्यानंतर अनेकांनी जावेद अख्तर यांना जमीनीवर आणत वास्तविक आकडेवारीची जाणीव करून दिली. राज्यात रविवारीच सक्रीय रुग्णांनी साठ लाखांचा टप्पा गाठला आहे. एकूण मृत्यूंची संख्या ७५ हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत, सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशात महाराष्ट्राकडून काय शिकायचे? असा सवाल एका नेटकऱ्याने केला. जावेद यांचे अख्तर यांचे ट्विट म्हणजे, जोक ऑफ द डे असल्याचे म्हणत त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही त्यांना दिला. एकाने तर थेट हे पेड ट्विट आहे का? असा सवाल जावेद अख्तर यांना केला.
60 lakh patients, 75,000 deaths, but the center is called Learn from Maharashtra, Javed Akhtar trolled by netizens
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील चार हजार पाने गायब, भाजपााचा धक्कादायक आरोप
- डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा