5G Revolution In India : कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये बरेच काही बदलले. ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यादरम्यान वेगवान इंटरनेटची गरज भासू लागली. दूरसंचार कंपन्यांनी देशात 5 जी तंत्रज्ञान सुरू करण्याची तयारी चालवली आहे. मागील काही महिन्यांपासून 5जी संबंधित नोकऱ्यांमध्येही वेगाने वाढ होत आहे. 5G revolution In India, More Than 1.5 Lakh Employment; Know About life Changing Technology
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये बरेच काही बदलले. ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. यादरम्यान वेगवान इंटरनेटची गरज भासू लागली. दूरसंचार कंपन्यांनी देशात 5 जी तंत्रज्ञान सुरू करण्याची तयारी चालवली आहे. मागील काही महिन्यांपासून 5जी संबंधित नोकऱ्यांमध्येही वेगाने वाढ होत आहे.
डेटा अॅनालिटिक्स कंपनी ग्लोबल डेटाच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 च्या तुलनेत भारतात 5-जी संबंधित रिक्त जागा जानेवारी-मार्च 2021 मध्ये दुपटीने वाढल्या. येत्या काही महिन्यांत या नोकऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण 5 जीच्या आगमनाने अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होतील.
कुठे-कुठे होणार रोजगार निर्मिती
- आयपी नेटवर्किंग, फर्मवेअर, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, बिग डेटा एक्स्पर्ट, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर
- वर्षअखेरीस भारतात सुरू होणााऱ्या 5G तंत्रज्ञानामुळे दीड लाखाहून जास्त रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बहुतांश भरती टेलिकॉम आणि आयओटी कंपन्यांद्वारे केल्या जाईल.
- पुढील दोन वर्षे बम्पर नोकऱ्या मिळतील. यातील बहुतेक नोकर्या कंत्राटावर असतील, परंतु देशात सर्वत्र महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा टेलिकॉम कंपन्यांवर फारसा परिणाम झाला नाही, या क्षेत्रात वाढच झाली.
5जी नोकऱ्यांसाठी प्रमुख कंपन्या
- सिस्को या बहुराष्ट्रीय अमेरिकन एकूण 5जी नोकऱ्यांपैकी 30 टक्के जागा असतील. सिस्कोकडून जगभरात 5 जीवर 6.6 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
- यानंतर एरिक्सन ही स्वीडिश कंपनी रिक्त जागांपैकी 20% भरती करणार आहे. याशिवाय कॅपजेमिनी, डेब्ट आणि हेल्व्हेट-पॅकार्ड या कंपन्यांतही 5जी संबंधित नोकर्या आहेत.
- भारतात 5 जी संबंधित बहुतांश नोकऱ्या जागतिक कंपन्यांमार्फत उपलब्ध होती. जिओ, एअरटेल आणि व्ही यांनी अद्याप 5 जी साठी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे काढलेली नाहीत.
- ट्रान्समिशन स्टेशन अभियंता, ड्राइव्ह टेस्ट अभियंता आणि देखभाल अभियंता अशा पदांवर काम सध्या उपलब्ध आहे. सर्किट डिझायनर ते स्ट्रॅटेजिक मास डेव्हलपर पदेही असतील. नेटवर्क अभियंता, प्रॉडक्ट डिझाइनर, डेटाबेस डेव्हलपर हेदेखील पदे आहेत. मशीन टू मशीन कम्युनिकेशन, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, पायाभूत सुविधा आणि सेवांमध्येही रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत.
5 जीसाठी भारतीय उत्सुक
एका सर्व्हेनुसार, भारतातील प्रत्येक व्यक्ती दरमहा 12 जीबी डेटा वापरते. पुढील पाच वर्षांत तो 25 जीबीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जागतिक दूरसंचार उद्योग मंडळाचा अंदाज आहे की, 2025 पर्यंत भारताचे 92 दशलक्ष मोबाईल ग्राहक असतील आणि त्यापैकी 8.8 कोटी ग्राहकांकडे 5 जी कनेक्शन असेल. 5 जी स्वीकारण्यासाठी पायाभूत सुविधा व सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल. ज्यामुळे या क्षेत्रात बम्पर रोजगार निर्माण होईल.
भारतात कोणत्या कंपन्यांकडून 5जीची तयारी?
- भारतातील 4 मोठ्या कंपन्या 5 जी लाँच करण्याची तयारी करत आहेत. जुलै 2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले की, जिओने भारतासाठी 5 जी सोल्यूशन विकसित केले आहे. काही महिन्यांनंतर जिओने कॅलिफोर्नियाच्या क्वालकॉम टेक्नॉलॉजीशी करार केला. यामुळे देशांतर्गत 5 जी नेटवर्कच्या पायाभूत सुविधांच्या आणि सेवांच्या कामास गती मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार, 24 जून 2021 रोजी होणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5 जी-सपोर्टिंग फोन आणि 5 जी लाँचिंगची घोषणा केली जाऊ शकते.
- एअरटेलने हैदराबादमध्ये 5जी चाचणी पूर्ण केली आहे आणि व्यावसायिक रोलआउटसाठी सज्ज आहे. व्ही आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) देखील 5 जी चाचण्या घेण्यास तयार आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सेवांच्या कार्यक्रमात सांगितले होते की, ‘आम्ही 2 जी, 3 जी, 4 जी मध्ये जगाच्या तुलनेत मागे आहोत, पण 5 जी मध्ये भारत जगापेक्षा वेगवान धावेल.’ महत्त्वाचे म्हणजे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये 5 जी सेवा सुरू झाली आहे.
5 जी तंत्रज्ञान 4 जीपेक्षा 20 पट वेगवान
5 जी एक अतिशय उच्च तंत्रज्ञान आहे, जे अत्यंत वेगवान वायरलेस नेटवर्क देते. पूर्ण एचडी मूव्ही काही सेकंदांत डाउनलोड होईल. तथापि, फक्त व्हिडिओ पाहण्यापेक्षा त्याचे इतर उपयोग जास्त आहेत. 5 जीच्या मदतीने ड्रायव्हरलेस ट्रान्सपोर्ट, स्मार्ट शहरे, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि खूप वेगवान रिअल टाइम अपडेट्स उपलब्ध होतील. याद्वारे एका कारला दुसऱ्या वाहनाशीही संपर्कही करता येईल आणि दोन्ही वाहनांमधील अंतर व वेग किती असावे याचा डेटाद्वारे निर्णय घेता येईल. 5जीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक विकसित होईल आणि यामुळे स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, होम स्पीकर आणि रोबोट्ससारखी सर्व यंत्रे अतिशय वेगवान आणि स्वयंचलित होतील.
5G revolution In India, More Than 1.5 Lakh Employment; Know About life Changing Technology
महत्त्वाच्या बातम्या
- Fact Check : कोव्हॅक्सिनमध्ये नवजात वासराच्या रक्ताच्या अंशाचे मेसेज चुकीचे, नेमकी कशी बनते लस, जाणून घ्या सत्य!
- आ. संजय शिंदेंवर 1500 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचा आरोप, पुण्यात बँकेसमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
- वसीम रिझवींनी छापले नवीन कुराण, दहशतवादाला चालना देणाऱ्या सांगत 26 आयती काढल्या
- Twitter Action : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा ट्विटरला इशारा, फ्री स्पीचच्या नावाखाली कायद्यापासून वाचू शकणार नाही
- ट्विटरवर कायद्याचा बडगा : गाझियाबाद पोलिसांकडून ट्विटरसह 9 जणांविरुद्ध FIR; घटनेला धार्मिक रंग दिल्याचा आरोप