एशियन बँकेकडून 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पॉवर फॉर ऑल या धोरणानुसार उत्तर प्रदेशातील ग्राहकांना विश्वासार्ह वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज भारत सरकारला मंजूर केले. त्या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
46,000 villages in Uttar Pradesh will be illuminated by electricity
उत्तर प्रदेशातील गावे विजेच्या प्रकाशाने उजळून निघावीत, या हेतूने हा करार केला. या प्रकल्पाचे नाव उत्तर प्रदेश उर्जा वितरण नेटवर्क पुनर्वसन, असे आहे. या प्रकल्पाअंतर्गत 46000 गावांना वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचा 70 लाख नागरिकांना फायदा होईल. कमी दाबाच्या विजपुरावठ्यासाठी 65 हजार किलोमीटरची वीजपुरवठा यंत्रणा उभी केली जाईल. या सर्व खर्चासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने 300 दशलक्ष डॉलर्सचा कर्जपुरवठा केला.
Asian Development Bank (ADB) & Govt of India today signed a USD 300 million loan to upgrade rural power distribution networks to provide reliable electricity supply to consumers in Uttar Pradesh: Finance Ministry
— ANI (@ANI) December 18, 2020
11-किलोवॉल्ट फीडरचे समांतर नेटवर्क
निवासी आणि कृषी ग्राहक यांच्यात वीज वितरण वेगळे करण्यासाठी एकूण 17,000 कि.मी. लांबीचे 11-किलोवॉल्ट फीडरचे समांतर नेटवर्क तयार केले जाईल. यामुळे शेतीची मागणी पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर, ग्रामीण निवासी ग्राहकांना वीजपुरवठा कालावधीत वाढ आणि ऊर्जा व जलसंधारण सुलभ होईल. या प्रकल्पामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) ची आर्थिक व्यवस्थापन क्षमता सुधारेल.
46,000 villages in Uttar Pradesh will be illuminated by electricity
प्रकल्पाचे नाव : उत्तर प्रदेश उर्जा वितरण नेटवर्क पुनर्वसन
कर्ज कोण देणार : एशियन डेव्हलपमेंट बँक, फिलिपाईन्स
किती कर्ज : 300 दशलक्ष डॉलर्स
किती गावांना फायदा : 46 हजार
किती लोकांना फायदा : 70 लाख विजपुरावठ्यासाठी : 65 हजार किलोमीटरची यंत्रणा
11-किलोवॉल्ट फीडर नेटवर्क : 17 हजार किलोमीटर