• Download App
    कोरोना मृतांचा नेमका आकडा किती? देशात ४० लाखांहून अधिक बळी गेल्याची भिती 40 lakh deaths due to corona

    कोरोना मृतांचा नेमका आकडा किती? देशात ४० लाखांहून अधिक बळी गेल्याची भिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाने देशभरात तब्बल ४० ते ४९ लाख लोकांचा बळी घेतला असू शकतो.’’ असा अंदाज आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांनी एका अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. 40 lakh deaths due to corona

    अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अधिकृतरीत्या चार लाखांपेक्षाही अधिक लोक मरण पावले असल्याचे सांगितले जात असले तरीसुद्धा प्रत्यक्षातील संख्या यापेक्षा कित्येकपटीने अधिक असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    अमेरिकेतील अभ्यासगट ‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’चे जस्टीन सँदेफर आणि हार्वर्ड विद्यापीठातील अभिषेक आनंद आदी मान्यवर या संशोधनात सहभागी झाले होते. स्वातंत्र्य आणि फाळणीनंतरची कोरोना ही सर्वांत मोठी शोकांतिका असल्याचे हा अहवाल तयार करणाऱ्या अभ्यासकांनी म्हटले आहे.



    या अहवालासाठी सात मोठ्या राज्यांतील प्रादेशिकस्तरावरील मृतांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता हा आकडा हा ३४ लाखांनी अधिक असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर वयोगटानुसार संसर्गामुळे मरण पावलेल्यांचा डेटा संकलित करण्यासाठी जी मानके वापरण्यात येतात, तीच मानके भारतातील सिरोसर्वेक्षणाच्या डेटासाठी वापरण्यात आली होती. या माध्यमातून मृतांचा आकडा हा चाळीस लाखांपेक्षाही अधिक भरला.

    40 lakh deaths due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…