विशेष प्रतिनिधी
जम्मू : दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील जैनापोरा भागातील बडीगाममध्ये गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळी सुरक्षा दल दक्षतेने उभे आहेत. यामध्ये चार दहशतवादी मारले गेले आहेत. 4 terrorists killed in Kashmir
त्याचवेळी चकमक स्थळाजवळ सुमो जीप उलटल्याने दोन जवानांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सुमो 44 आरआर चौगाम कॅम्पमधून सैन्यासह बुडीगाम येथे चकमकीच्या ठिकाणी जात होती. वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दोन्ही जखमींना शोपियांच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी घराबाहेर अंदाधुंद गोळीबार करून एका काश्मिरी हिंदू कुटुंबातील एका व्यक्तीची हत्या केली. मृत व्यक्तीच्या घरावर सुरक्षेसाठी दोन पोलीसही तैनात करण्यात आले होते. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाच्या नव्या दहशतवाद्याचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.
4 terrorists killed in Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका
- राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे जंगलराज, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप
- निवडणुकीत पडला म्हणून काँग्रेस उमेदवार जनतेला गाण्यात म्हणाला गद्दार
- माझ्या भीमा, तू उद्धरली माझ्यासारखीच कोट्यवधी कुळे…