• Download App
    हुकूमशाहीच्या अंधारात अत्याचाराचे आवर्त; कोठड्यांमधली दंडुकेशाही; जयप्रकाश, मोरारजींची धरपकड, जॉर्ज फर्नांडिसांच्या भावांचा छळ आणि बरेच काही... 25 june 1975 black day of democracy; jai prakash narayan arrested

    हुकूमशाहीच्या अंधारात अत्याचाराचे आवर्त; कोठड्यांमधली दंडुकेशाही; जयप्रकाश, मोरारजींची धरपकड, जॉर्ज फर्नांडिसांच्या भावांचा छळ आणि बरेच काही…

    २५ जून १९७५ – आणीबाणी लागू करून लोकशाहीवर घाला घातला आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली. विरोधी नेत्यांची धरपकड झाली. यातून जयप्रकाशांसारखे ज्येष्ठही सुटले नाहीत की मोरारजींसारखे राजकीय प्रतिस्पर्धीही सुटले नाहीत. 25 june 1975 black day of democracy; jai prakash narayan arrested

    सगळ्यांना त्या रात्रीच अटक करण्यात आली. का…??, तर त्यांनी इंदिरा राजवटीला विरोध केला म्हणून. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. जयप्रकाश नारायण यांचा मुक्काम नेहमीप्रमाणे गांधी शांती प्रतिष्ठानच्या कचेरीत होता. पोलीसांनी त्यांना तिथून अटक केली आणि पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनवर आणले. सोपस्कार केले आणि हरियाणातील सोहनाला नेले. सोहनाच्या सरकारी विश्रामगृह हा तुरूंग बनवला होता. त्यांना तेथे ठेवण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ मोरारजी देसाईंना तेथे आणण्यात आले. दोघांनीही एकमेकांना विचारले तुम्हालाही पकडलेय वाटते… एवढेच बोलणे त्यांच्यात होऊ शकले. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले.

    त्यानंतर ते दोघेही एकमेकांना भेटू शकले, ते १८ जानेवारी १९७७ रोजी. आणीबाणी संपल्यानंतरच. स्थानबध्दतेतला सगळा अनुभव जयप्रकाशांनी प्रिझन डायरीत लिहिला आहे. जयप्रकाश आजारी होते. त्यामुळे डॉक्टर आणि नर्स त्यांची तब्येत तपासून जात असत. पण त्यांच्याशी मिनिटभर देखील बोलण्याची परवानगी त्यांना नव्हती. एकलकोंडी होती ती. जयप्रकाशांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात हा डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतरच इंदिरा राजवटीने त्यांची सुटका केली. पण मोरारजी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी आदी बाकीचे राजकीय कैदी आतमध्येच होते.

    जॉर्ज फर्नांडिस हे आणीबाणी विरोधी लढ्यातील एक अग्रगण्य नाव. ते काही काळ भूमिगत झाले. पण पोलीसांनी त्यांचा शोध थांबविला नाही. त्यांचा ठावठिकाणा काढण्यासाठी जॉर्ज फर्नांड़िस यांचे भाऊ मायकेल फर्नांडिस आणि लॉरेन्स फर्नांडिस यांना पोलीसांनी टार्गेट केले. याची भयावह कहाणी प्रख्यात पत्रकार आणि केसरीचे तत्कालीन सहसंपादक वि. स. वाळिंबे यांनी त्यांच्या बंगलोर ते रायबरेली पुस्तकात लिहिली आहे.

    मायकेल फर्नांडिस यांना रासूका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली स्थानबध्द केले. लॉरेन्स यांच्यावर थर्ड डिगरी पोलीसी अत्याचार करण्यात आले. त्यांना कपडे काढून मारले. या मारहाणीमुळे लॉरेन्स बेशुध्द पडले. ५ तासानंतर शुध्दीवर आल्यावर लॉरेन्स यांनी पाणी मागितले. त्यांना दोन चमचे पाणी पाजण्यात आले. नंतर अंधार कोठडीत डांबले. ९ दिवस उपाशी ठेवले. नंतर चित्रदुर्ग येथील कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. लॉरेन्स यांची एकच चूक होती, जॉर्ज फर्नांडिस हे कुठे आहेत, हे त्यांना माहिती नव्हते. आणि पोलीसांना त्यांनी त्यांची माहिती दिली नाही. पोलीसी अत्याचारांमुळे लॉरेन्स कायमचे अधू झाले होते.

    कन्नड सिनेमातले एक महत्त्वाचे नाव स्नेहलता रेड्डी आणि पट्टाभींची कहाणी देखील अशीच भयावह आहे. फर्नांडिस कुटुंबीयांचे हे स्नेही. हा एवढाच त्यांचा “गुन्हा.” त्याबद्दल त्यांना पोलीसी दंडुकेशाही सहन करावी लागली. ही एवढी भयानक होती, की त्यामुळे स्नेहलतांचा ५ दिवसांमध्येच मृत्यू ओढवला.

    स्नेहलता आणि पट्टाभी हे सिनेमाच्या कामासाठी मद्रासला गेले असताना पोलीसांनी त्यांचा मुलगा कोणार्कला बेंगलोरमध्ये पकडले. मुलाला पकडल्याची बातमी येताच दोघेही बेंगलोरला परतले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीसांनी कोणार्कला आणि पट्टाभींना घरी जाऊ दिले पण स्नेहलता यांना अटक केली. त्यांना अंधार कोठडीत डांबण्यात आले. त्यांना दम्याचा विकार होता. पण त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यांनी पती आणि मुलाला भेटू देण्याची परवानगी मागितली पण ती त्यांना देण्यात आली नाही. दम्याचा विकार बळावल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली. पण अंधार कोठडीतील वास्तव्याचा स्नेहलतांना एवढा धक्का बसला होता, की त्यांची तब्येत जी ढासळली ती कायमचीच. सुटकेनंतर अवघ्या ५ दिवसांमध्ये त्यांचा मृत्यू ओढवला.

    पोलीसी दंडुकेशाहीच्या आणि अत्याचाराच्या या एवढ्याच कहाण्या नाहीत. आणीबाणीची अडीच वर्षे अशाच असंख्य कहाण्यांनी भरलेली आहेत. इतिहासाच्या पानापानांमध्ये दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील योध्द्यांचे रक्त सांडलेले तुम्हाला दिसेल. नेहरूकन्येची सत्ता टिकावी आणि नेहरूंच्या नातवाकडे सत्तेचा वारसा बिनदिक्कतपणे जावा, यासाठी हे महाभारत घडविण्यात आले. पण त्याचा अंत नेहरूकन्येला हवा होता तसा घडला नाही. हा देखील इतिहास आहे…!!

    25 june 1975 black day of democracy; jai prakash narayan arrested

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…