• Download App
    20 Years Of PM Modi : सार्वजनिक जीवनात पीएम मोदींची 20 वर्षे पूर्ण, ग्राफिक्समधून वाचा अत्यंत महत्त्वाच्या 20 फॅक्ट्स । 20 Years Of PM Modi PM Modi Complited 20 years In Public Life Know 20 Interesting Facts Of Peoples Leader

    20 Years Of PM Modi : सार्वजनिक जीवनात पीएम मोदींची 20 वर्षे पूर्ण, ग्राफिक्समधून वाचा महत्त्वाच्या 20 फॅक्ट्स

    20 Years Of PM Modi : 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक आयुष्याला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात पंतप्रधान मोदींच्या नावावर अनेक विक्रम, उल्लेखनीय कामगिरींची नोंद झालेली आहे. तसेच याच काळात त्यांच्यावर बरीच टीकाही झाली आहे. पण कुणीही हे सत्य नाकारू शकणार नाही की, ते देशातील एकमेव असे नेते आहेत जे राज्यात किंवा केंद्रात सत्ता गमावल्याविना गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च पदावर आहेत. म्हणूनच पंतप्रधान मोदींविषयीच्या अशाच काही रंजक फॅक्ट्सची माहिती येथे देत आहोत… PM Modi Complited 20 years In Public Life Know 20 Interesting Facts Of Peoples Leader


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गत महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71वा जन्मदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने तर यानिमित्त सेवा समर्पण अभियान 20 दिवसांचे ठेवले होते. 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक आयुष्याला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात पंतप्रधान मोदींच्या नावावर अनेक विक्रम, उल्लेखनीय कामगिरींची नोंद झालेली आहे. तसेच याच काळात त्यांच्यावर बरीच टीकाही झाली आहे. पण कुणीही हे सत्य नाकारू शकणार नाही की, ते देशातील एकमेव असे नेते आहेत जे राज्यात किंवा केंद्रात सत्ता गमावल्याविना गेल्या 20 वर्षांपासून सर्वोच्च पदावर आहेत. म्हणूनच पंतप्रधान मोदींविषयीच्या अशाच काही रंजक फॅक्ट्सची माहिती येथे देत आहोत…

    दोन दशके एकदाही घेतला नाही ब्रेक

    1. 2001 हे असे वर्ष होते जेव्हा पंतप्रधान मोदींनी कोणतेही उच्च पद नसताना त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याला 20 वर्षे झाली आहेत. तेव्हापासून ते सत्तेच्या शीर्षस्थानी आहेत. हे तुम्ही ते दिवसांमध्ये मोजले तर ते 7285 दिवसांपासून सत्तेत टॉपवर आहेत.

    2. उल्लेखनीय म्हणजे 2001 ते 2014 पर्यंत म्हणजेच 12 वर्षे 227 दिवस (एकूण 4607 दिवस) मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

    3. यानंतर 2014 मध्ये ते देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी पीएमओमध्ये 2671 दिवस घालवले आहेत.

    4. फक्त पंतप्रधानपदाबद्दल बोलायचे झाल्यास तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर ते दीर्घकाळ निवडून आलेल्या सरकारचे नेतृत्व करणारे चौथे पंतप्रधान आहेत.

    5. नेहरू 6130 दिवस पंतप्रधानपदावर राहिले, तर इंदिराजींनी 5829 दिवस पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. तर मनमोहन सिंग 3655 दिवस पंतप्रधान राहिले. मोदींना नेहरूंचा विक्रम मोडायचा असेल तर त्यांना मार्च 2031 पर्यंत पंतप्रधानपदी राहावे लागेल.

    राज्यानंतर देशाच्या सर्वोच्च पदावर

    6. देशातील 14 पैकी 6 पंतप्रधान असे आहेत ज्यांनी मुख्यमंत्रिपदाची शोभा वाढवली आहे. पंतप्रधान मोदी त्यापैकी एक आहेत. एचडी देवेगौडा असे मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या शेवटच्या पंतप्रधानांचे नाव होते. देवेगौडा 1994 ते 1996 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. यानंतर 1996 ते 1997 पर्यंत ते देशाचे पंतप्रधानही होते. तथापि, पंतप्रधान बनलेल्या इतर मुख्यमंत्र्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री म्हणूनचा कार्यकाळ सर्वात जास्त काळ राहिला आहे. ते 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

    पक्षाचा सर्वात विश्वासू चेहरा

    7. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजवरचा भाजपचा सर्वात विश्वासू चेहरा ठरले आहे. त्यांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा राज्य आणि देशपातळीवरील निवडणुका जिंकल्या आहेत.

    8. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवणारे भाजप 1984 नंतर देशातील पहिला पक्ष ठरला. पाच वर्षांनंतर 2019 मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि 300 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. यामध्ये त्यांची मतांची टक्केवारी 37.36 होती जी एक विक्रम आहे. 2014 पासून, पीएम मोदी भाजपच्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचा चेहरा आहेत आणि पक्षाने अनेक वेळा विजय मिळवला आहे.

    अनेक विक्रम

    9. पंतप्रधान मोदींच्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक संस्मरणीय क्षणांची नोंद झाली आहे. जानेवारी 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ होती.

    10. जुलै 2017 मध्ये, मोदी इस्राइलला भेट देणारे देशाचे पहिले पंतप्रधान बनले.

    11. 2014 मध्ये, सार्क देशांच्या प्रमुखांना आपल्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान बनले.

    12. गेल्या महिन्यात ते संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष असलेले पहिले भारतीय पंतप्रधान बनले.

    13. याशिवाय त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. 2019 मध्ये रशिया आणि यूएईने त्यांचा सन्मान केला. त्याच वेळी 2020 मध्ये, अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांचा सन्मान केला. 2021 मध्ये, टाइम मासिकाने त्यांना 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत समाविष्ट केले.

    प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले पंतप्रधान

    14. पंतप्रधान मोदींची लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, जगातील 13 प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च मान्यता रेटिंग आहे.

    15. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये जेव्हा त्याने लॉकडाऊन लावला तेव्हा त्यांची कीर्ती 82 टक्क्यांपर्यंत होती.

    16. त्याचबरोबर सोशल मीडियामध्येही त्यांची स्वतंत्र ओळख आहे. येथे त्यांना जगातील सर्वात सक्रिय राजकारण्यांपैकी सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे एकूण 177 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फक्त अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे एकत्रित फॉलोअर्स एवढे आहेत.

    17. इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींचे 60 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे जगातील कोणत्याही राजकारण्यासाठी सर्वात जास्त आहेत.

    18. पंतप्रधान मोदींच्या सरकारने सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये जम्मू-काश्मिरातून कलम 370चे उच्चाटन, नागरिकत्व संधोशन विधेयक, अयोध्या वादाची अखेर, तीन तलाकवर कायदा, दहशतवादावर झीरो टॉलरन्स, देशभरात स्वच्छतेसाठी प्रचंड जनजागृती अशा काही ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे.

    19. पीएम मोदींच्या नुकत्याच झालेल्या 71व्या जन्मदिनी देशभरातून ऐतिहासिक विक्रम रचत तब्बल 2.50 कोटी लसीकरण एकाच दिवसात करून लाडक्या पंतप्रधानाला अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.

    20. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर जर कोणत्याही राजकारण्याने भारताला जागतिक राजकीय मंचावर एक मजबूत स्थान मिळवून देण्यात यश मिळवले असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. त्यांच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत भारताने जागतिक पातळीवर आपली मुळे घट्टपणे प्रस्थापित केली आहेत. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स किंवा जपान भारताला त्यांच्या राजकारणात सोबत ठेवून त्यांची जागतिक रणनीती आखण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहिती आहे की, आता जागतिक राजकारणात भारताकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही.

    PM Modi Complited 20 years In Public Life Know 20 Interesting Facts Of Peoples Leader

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य