- दिल्ली सरकारचा प्रताप; कोरोना संसर्गावर खर्च नाही
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी दिल्ली सरकारच्या एलजी / सीएम रिलीफ फंडामध्ये 34 कोटी 69 लाख 99 हजार रुपये आले. त्यापैकी केवळ 17 कोटी 2 लाख 44 हजार रुपये खर्च केले. आश्चर्याची बाब म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकही पैसा खर्च केला नाही. एका माहिती अधिकार उत्तरातून हा खुलासा झाला आहे.
17 crore wasted from Corona fund
नोव्हेंबर २०२० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक पांडे यांनी यासंदर्भात आरटीआय दाखल केला. या आरटीआयचे उत्तर विवेक पांडे यांना 15 डिसेंबर 2020 रोजी मिळाले. आरटीआयमध्ये दिल्ली सरकारला कोरोनाच्या नावावर सुमारे 34 कोटींचा निधी मिळाला. यातून अरविंद केजरीवाल सरकारला केवळ 17 कोटी खर्च करता आले आहेत.
आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीचा तपशील देताना ओप इंडियाशी विवेक म्हणाले की, प्रश्नांपैकी फक्त एकाला उत्तर देण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्त्याने सांगितले की त्यांनी दिल्ली महसूल विभागाला आरटीआयही पाठविला असून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
17 crore wasted from Corona fund
विवेक यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारने त्यांना कोरोना विषाणूसाठी खर्च केलेल्या डेटाची संपूर्ण माहिती पाठविली नाही. दिल्ली सरकारने कोणत्या विभागातील आणि कोणत्या कामात हा निधी खर्च केला आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला होता, परंतु त्यांना माहिती दिली नव्हती.