विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशच्या प्राथमिक शाळांची मुले मिशनरी आणि कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांप्रमाणे फाडफाड इंग्रजी बोलू शकतात. याचे श्रेय जाते ते उत्तर प्रदेश सरकारला योगी सरकारला .यासाठी राज्यातील 15 हजार शाळांचे इंग्रजी माध्यमात रुपांतर करण्यात आले आहे . या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी मिशनरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना मागे टाकत आहेत.हा निर्णय वर्तमान शिक्षण प्रणाली,आधुनिकीकरण व सरकारी शाळांमध्ये शिकत असणार्या मुलांचे इंग्रजीमधील कौशल्य वाढविण्यासाठी घेण्यात आला.15000 primary and upper primary schools into English medium
राज्यात दीड लाखाहून अधिक सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा असून त्यामध्ये सुमारे 1.83 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. योगी सरकारने जवळपास 1.5 लाख शाळांचे संचालन नूतनीकरण करून शाळांमध्ये चांगल्या शिक्षणाची सोय निर्माण केली. याशिवाय राज्यातील 15 हजार शाळांना इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्यात आले आहे. यातील दहा हजार प्राथमिक आणि पाच हजार उच्च प्राथमिक शाळांमध्ये मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवले जात आहे.
राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की योगी सरकारने गेल्या चार वर्षांत प्राथमिक शिक्षणात सर्वाधिक बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सरकार सर्व प्रकारचे ठोस पावले उचलत आहे. विद्यार्थ्यांना हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी स्वेटर दिले जातात तसेच विनामूल्य पुस्तके ड्रेस, बॅग, शू-स्टॉकिंग्ज देखील दिले जातात.
मूलभूत शिक्षण संचालक सर्वेंद्र विक्रम सिंह सांगतात की राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक भागातील दोन ते तीन शाळा इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर विकसित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणार्या मुलांचा कोर्सही इंग्रजी माध्यमाचा आहे. शासनाचे उद्दीष्ट आहे की प्राथमिक शाळेतील मुलांनी मिशनरी शाळांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे इंग्रजीमध्ये बालावे. त्याचे निकालही आता समोर येत आहेत.
शिक्षकांच्या सहयोगाने राज्यातील प्राथमिक इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बोलतात. राज्यातील 15 हजार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विकसित केल्या आहेत. शिक्षकांच्या परिश्रमांमुळे येथील विद्यार्थी खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांविरूद्ध स्पर्धा करीत आहेत. केवळ लखनौमध्ये सुमारे 60 प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना इंग्रजी माध्यमामध्ये विकसित करण्यात आले आहे.
बाराबंकी येथील हीरापूर प्राथमिक शाळेच्या प्रभारी शिक्षिका वंदना श्रीवास्तव म्हणाल्या की, त्यांची शाळा ब्लॉकमधील सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये गणली जाते. यासाठी त्यांना सरकारकडून सन्मानही मिळाला आहे. या शाळेमध्ये मध्ये स्मार्ट क्लास आणि मुलांसाठी लायब्ररी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळकरी मुले आता फाडफाड इंग्रजीत बोलतात.
विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने ‘ऑपरेशन कायाकल्प’ अंतर्गत (प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षण सुधारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा पुढाकार) अंतर्गत 1.5 लाख शाळांचे नूतनीकरण केले आहे .
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 30 मुलींची वसतीगृहे देखील सुरू केली आहेत.
15000 primary and upper primary schools into English medium