ठाकरे सरकार लावणार राणांवर राजद्रोहाचे कलम; पवार करणार नक्षलवादाचे समर्थन!!
ठाकरे सरकार लावणार राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाचे 124 ए कलम आणि पवार मात्र करणार नक्षलवादाचे समर्थन…!! या दोन गोष्टी परस्पर विसंगत वाटल्यास तरी प्रत्यक्षात त्यामध्ये एक निश्चित राजकीय अशी सुसंगती आहे.124A: Sedition clause on Rana couple and Pawar’s Naxal supporter “Vishwamitri Pavitra”
राणा दांपत्याने केवळ मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी विषयी विविध विधाने केली म्हणून ठाकरे – पवार सरकारने त्यांच्याविरुद्ध 124 ए राजद्रोहाचे कलम लावले आहे.
पण त्याच वेळी भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र 124 ए हे राजद्रोहाचे कलम पूर्णपणे रद्द करुन टाकावे. कारण ते ब्रिटिश काळात भारतीय देशभक्तांविरुद्ध वापरलेले कलम आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे नक्षलवादाचे समर्थन केले आहे.
भीमा कोरेगाव दंगल : पवारांचे प्रतिज्ञापत्र
राणा दाम्पत्याचे मुख्यमंत्र्यांविरुद्धचे आंदोलन आणि भीमा कोरेगावची दंगल यामध्ये अजिबात परस्पर संबंध नाहीच, तर गुणात्मक फरक देखील आहे. दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. तरी देखील दोन्हीकडे लावलेले कलम 124 ए हे कलम मात्र समान आहे. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी शरद पवारांना 5 मे रोजी साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहायचे आहे. त्यापूर्वी शरद पवारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आयोगासमोर आपले म्हणणे आज सादर केले आहे. आपल्या या म्हणण्यामध्येच शरद पवारांनी 124 ए कलम कायमचे रद्द करण्याची गरज व्यक्त केली आहे. अर्थातच त्याचा संबंध भीमा कोरेगावची दंगल, एल्गार परिषद त्यामध्ये झालेली भाषणे यांच्याशी आहे.
शहरी नक्षलवादाविरुद्ध 124 ए
124 ए हे कलम एनआयए या राष्ट्रीय तपास संस्थेने शहरी नक्षलवादाचे समर्थक सुधीर ढवळे, वर्नन गोल्सान्विस, सुधा भारद्वाज आदींविरुद्ध लावले आहे. ज्यांनी केंद्रातल्या सरकारविरुद्ध सशस्त्र कारवाई करण्याची चिथावणी दिली, वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसक आंदोलनांना बौद्धिक समर्थन प्राप्त करून दिले त्यांच्याविरुद्ध 124 ए हे कलम लावले आहे आणि शरद पवारांना या नक्षली समर्थकांवर लावलेले 124 ए कलम रद्द करायचे आहे…!!
पवारांचा विश्वामित्री पवित्रा
राणा दाम्पत्यावर लावलेल्या 124 ए कलमा विषयी शरद पवारांनी एकही उद्गार काढलेला नाही. किंबहुना त्या विषयापासून ते एक प्रकारे फटकूनच राहिले आहेत. राणा दांपत्याने आंदोलन शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध केले आहे, ते त्यांनी परस्पर बघून घ्यावे असाच “विश्वामित्री पवित्रा” शरद पवारांनी घेतला आहे.
शिवसेनेविरुद्ध राणांच्या विजयात राष्ट्रवादीचा वाटा
वास्तविक नवनीत राणा 2019 मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या. 2019 नंतरचे राजकीय रागरंग पाहून नवनीत राणा यांनी मोदी सरकारला अनुकूल भूमिका घ्यायला सुरुवात केली. परंतु त्यांचे शरद पवारांबरोबरचे संबंध आजही राजकीयदृष्ट्या मधूरच राहिले आहेत. शरद पवारांच्या अमरावती दौर्यात देखील याचा प्रत्यय आला आहे.
राजकीय पडसाद
परंतु नवनीत राणा आणि रवी राणा या लोकप्रतिनिधींवर लावलेल्या 124 ए कलमा विषयी शरद पवारांनी चकार शब्द काढलेला नाही. पण भीमा कोरेगावच्या दंगलीच्या साक्षी मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना मात्र अप्रत्यक्षपणे नक्षलवादाचे समर्थन करत त्यांनी 124 ए या कलमाला विरोध केला आहे. ही घटना राजकीय दृष्ट्या बरीच “बोलकी” ठरली आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भविष्यकाळात पवारांच्या या “विश्वामित्री पवित्र्या”चे आणि “निवडक भूमिकेचे” पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत…!!
124A: Sedition clause on Rana couple and Pawar’s Naxal supporter “Vishwamitri Pavitra”
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik : 5000 पानी आरोपपत्र, सुप्रीम कोर्टाच्या झटक्यानंतर आता तब्येतीचे कारण दाखवत मलिकांचा पुन्हा जामीन अर्ज!!
- एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची वाहनांना धडक
- Petrol Diesel Hike : सत्य टोचते, पण आकडे बोलतातच; हरदीपसिंग पुरींनी ठाकरे – पवार सरकारला सुनावले!!
- सभांचा धडाका : 1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस “बूस्टर डोस” सभा!!