• Download App
    कल्याण डोंबिवलीत १०९ प्रवासी नॉट रिचेबल महापालिकेकडून शोध मोहीमेला सुरुवात 109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali; Search operation started by the municipality

    WATCH : कल्याण डोंबिवलीत १०९ प्रवासी नॉट रिचेबल महापालिकेकडून शोध मोहीमेला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक ३३ वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच बरोबर नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने महानगरपालिका सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेले १०९ जण नॉट रिचेबल झाले आहेत.

    महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक व इमारतीत राहणाऱ्या लोकांची rt-pcr तपासणी सुरू केली आहे. महानगरपालिका आयुकतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पालिका शासनाकडून विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी मिळाली. त्यापैकी ८८ नागरिकांची ऑंटी जैन टेस्टिंग करण्यात आली असून ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले असून ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सागत या यादीतील १०९ पैकी काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ तर काही प्रवशांच्या घराला कुलूप असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यांनी दिली.
    त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस होम कोरोटाईन बंधनकारक केले आहे.

    – कल्याण डोंबिवलीत १०९ प्रवासी नॉट रिचेबल

    – दक्षिण आफ्रिकेसह अन्य देशातून आले होते.

    – प्रवासी सापडत नसल्याने पालिका धास्तावली

    – शोध मोहिमेला पालिकेकडून सुरुवात

    – काही प्रवाशांच्या घराला कुलूप लावलेले आढळले

    109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali; Search operation started by the municipality

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…