निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगेला दूधगंगा असेही म्हणतात. आकाशगंगेचा पट्टा उत्तर ध्रुवाच्या ३०० किलोमीटर जवळून जातो. याची जास्तीत जास्त रुंदी अंदाजे ४५० मीटर तर कमीत कमी रुंदी अंदाजे ५० मीचर आहे. साधारणपणे खगोलाच्या उत्तर गोलार्धात हा पट्टा शृंगाश्व, मिथुन, वृषभ , सारथी, ययाती , शर्मिष्ठा , सरठ , हंस , जंबुक, शर व गरूड या तारकासमूहांतून जातो 100 billion stars in the Milky Way galaxy
आणि दक्षिण गोलार्धात धनू, रेखाटणी, पीठ, नरतुरंग, त्रिशंकू, नौका व नौकाशीर्ष या तारकासमूहांतून जातो. आकाशगंगेच्या दक्षिण भागात जास्त तारे आहेत. पृथ्वी ही सूर्यकुलाचा एक घटक आहे. अनेक ग्रह-उपग्रह मिळून सूर्यकुल बनलेले आहे. सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच आकाशगंगा होय. असे अनेक समूह अवकाशात आहेत. त्यांना दीर्घिका म्हणतात आणि सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपण आकाशगंगेत असल्याने आपल्याभोवती जेवढे म्हणून लहानमोठे तारे नुसत्या डोळ्यांनी रात्री दिसतात,
ते सर्व आकाशगंगेतच आहेत. परंतु पट्टा ज्या ज्या ठिकाणी दिसतो त्या त्या बाजूस ताऱ्यांची दाटी असल्याने पट्टा हे तिचे आपल्या दृष्टीने दृश्य स्वरूप आहे. नुसत्या डोळ्यांनी सु. ५,००० तारे दिसू शकतात. परंतु त्यांच्याशिवाय दुर्बिणीतून दिसणारे व न दिसणारे, सूर्यापेक्षा लहान तसेच सूर्यापेक्षा अतिशय मोठे, तेजस्वी असे कोट्यवधी तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आकाशगंगेत सु. १०० अब्ज तारे असावेत असे शास्त्रज्ञ म्हणतात.
या ताऱ्यांखेरीज आकाशगंगेत अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे, तारकागुच्छ वगैरे निरनिराळ्या प्रकारचे घटक आहेत. आंतरतारकीय द्रव्य, उष्ण वायू, धूलिकण वगैरे इतस्ततः पसरलेले आहेत, ते वेगळेच. आकाशगंगेच्या पट्ट्यात या सर्वांची फार दाटी असल्याने त्या सर्वाच्या प्रकाशामुळे एक दुधाळ रंगाचा पट्टा दिसतो. मोठ्या दुर्बिणीतून यातील ताऱ्यांचा अलगपणा दृष्टोत्पत्तीस येतो. आकाशगंगेतील ११८ गोलाकार तारकागुच्छांपैकी ३० धनू राशीच्या बाजूला म्हणजे गंगेच्या मध्याकडे आहेत आणि तिकडेच पट्टा जास्त दाट दिसतो.