• Download App
    ३ फेब्रुवारीची आग काँग्रेसजनांनी ५ एप्रिलला ट्विटरवर "पेटवली" | The Focus India

    ३ फेब्रुवारीची आग काँग्रेसजनांनी ५ एप्रिलला ट्विटरवर “पेटवली”

    विशेष  प्रतिनिधी

    मुंबई : सोलापूर विमानतळ परिसरात फेब्रुव्रारी महिन्यात आग लागली होती. पण काँग्रेसजनांनी ही आग ५ एप्रिलचे दिवे उजळणीनंतर ट्विटरवर “लावली. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतरच सोलापूर परिसरात फटाके वाजवण्यात आले. त्यांची ठिणगी पडून सोलापूर विमानतळ परिसरात आग लागली, अशा अफवा ट्विटरवर पसरवण्यात आल्या. यात स्थानिक काँग्रेस नेते, काही टीव्ही अँकर्स, आघाडीवर होते. त्यांनी ट्विटर टोळ्या अक्टिव्हेट करून त्याच आगीचे फोटो ट्विटरवर फिरवले.

    इतर सोशल मीडियावर तेच फोटो, व्हिज्यूअल्स फिरवण्यात आले. पण fact check केल्यावर मात्र या काँग्रेस नेत्यांची आणि ट्विटर टोळ्यांची बदमाषी उघड झाली. कारण ते फोटो आणि व्हिज्यूअल सोलापूर विमानतळाचे असले तरी ते ३ फेब्रुवारी २०२० चे होते आणि abpmaza चँनेलवरून त्या वेळी ती बातमी प्रसारित केल्याचे होते हे लक्षात आले त्यामुळे “आग फेब्रुवारीची; धग ५ एप्रिलला” हा काँग्रेसी, सेलिब्रिटी आणि चँनेली प्रयोग फसला…!!

    Related posts

    उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!

    करून सावरून रेव्ह पार्टी, राजकीय आरोप प्रत्यारोपांमधून आरोपींना victim card खेळायची संधी!!

    महाराष्ट्राच्या इतिहासात 70 वर्षांमध्ये झाली नाही, एवढी गेल्या 150 दिवसांमध्ये बदनामी; सुप्रिया सुळेंच्या “जावईशोधाची” नोंद फडणवीस सरकारने गॅझेट मध्ये करावी!!