• Download App
    ३३ वर्षांपूर्वीच्या रामायणाची जादू आजही कायम; १७ कोटी लोकांनी पाहिले...!! | The Focus India

    ३३ वर्षांपूर्वीच्या रामायणाची जादू आजही कायम; १७ कोटी लोकांनी पाहिले…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दूरदर्शनवरील रामायणाची जादू ३३ वर्षांनंतरही कायम आहे. रामायण लागले की त्या वेळी रस्ते ओस पडायचे. आताही त्या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या शनिवारी रामायण सुरू झाले. ते १७ कोटी लोकांनी पाहिल्याचे ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च सेंटरच्या सर्वेतून ही माहिती पुढे आली आहे. चिनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात दूरदर्शनने आपल्या खजिन्यातील जुन्या लोकप्रिय मालिका पुन:प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. या मालिकांना आताच्या प्रेक्षकांनीही उदंड प्रतिसाद दिल्याचे बीएआरसीचे सीइओ संज़य लुल्ला यांनी सांगितले. यामध्ये रामानंद सागर यांची रामायण मालिका अव्वल ठरली आहे. गेल्या शनिवारची सुरवातीचा एपिसोड साडेतीन कोटी लोकांनी पाहिला तर सायंकाळच्या एपिसोडला साडेचार कोटी लोकांनी प्रतिसाद दिला. रविवारचे सकाळ, सायंकळाचे एपिसोड अनुक्रमे साडेचार आणि पाच कोटी लोकांनी पाहिले. हा प्रतिसाद पाहून दूरदर्शनकडे जाहिरातदारही आकृष्ट झाले आहेत. त्यांना स्लॉट वाढवून देण्याचाही विचार सुरू आहे, असे लुल्ला यांनी स्पष्ट केले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…