विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वत:च्या कर्करोगाच्या वेदना दूर ठेवत पोलिस अधिकारी कोरोना युद्धात उतरल्याचे उदाहरण दिल्लीत घडले आहे.
बाह्य दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त आनंद मिश्रा यांना थायरॉइड ग्लँड कर्करोगाचे निदान महिनाभरापूर्वी झाले. त्याचवेळी दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढत होता.
त्यांनी आपले दुखणे बाजूला ठेवून ड्यूटी फर्स्ट म्हणत कामाला प्राधान्य दिले. स्थलांतरित मजूरांच्या राहण्या जेवण्याची व्यवस्था केली. बरेच दिवस याच कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. आपल्या सहकाऱ्यांना देखील मिश्रा यांनी आपल्या गंभीर आजाराची कल्पना दिली नाही.
Two of Mumbai Police’s heroes – HC Chandrakant Ganapat Pendurkar and HC Sandip Surve – succumbed to the fight against Coronavirus. In the memory of the departed souls, Mumbai Police will not be uploading any tweets today. Only responses will be given. pic.twitter.com/yAAaUDGDu7
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 26, 2020
परंतु, दुखणे वाढल्यावर काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना कर्करोगाच्या गांभीर्याची आणि तो आणखी पसरण्यापूर्वी शस्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मिश्रा दिल्लीतील रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावरील शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून अहवालाची प्रतिक्षा आहे.
मिश्रा यांनी दाखविलेल्या अतुलनीय धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल दिल्ली पोलिस दलात त्यांचे कौतूक होत आहे.