• Download App
    सोशल डिस्टसिंग को मारो गोली; जनधन पैसों के लिये करो गर्दी...!! मालेगावातील प्रकार | The Focus India

    सोशल डिस्टसिंग को मारो गोली; जनधन पैसों के लिये करो गर्दी…!! मालेगावातील प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव :  सरकारने केलेली सोशल डिस्टसिंगची सूचना पाळणार नाही; पण सरकारने जनधन खात्यात भरलेले पैसे काढण्यासाठी मात्र गर्दी करू, हा “खाक्या” मालेगावातील नागरिकांनी दाखवला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणार मात्र कगद नाही दाखवणारचा “शाहीनबागी” नाटकाचा दुसरा अंक कोरोना लॉकडाऊनमध्ये असा सादर होतोय…!!

    करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात संचारबंदी लागू असून प्रशासनाकडून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र मालेगाव शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

    केंद्र शासनाने जनधन खाते धारकांच्या खात्यात ५०० रुपये मदत निधी जमा केली असून सदर रक्कम काढण्यासाठी खातेदारांनी सर्वच बँक मध्ये एकच गर्दी केली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे. मालेगाव शहरात सद्य स्थितीत एकही करोना सदृश्य रुग्ण नसला तरी यामुळे शहरात रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    • मालेगावात आमदार मुफ्तीच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण केली.
    • आमदार मुफ्ती लॉकडाऊन तोडून कार्यक्रमात सामील झाल्याने त्यांना सक्तीने क्वारंटाइन करावे लागले.
    •  सगळा देश लॉकडाऊन असताना मालेगावातील काही यंत्रमाग चालू ठेवण्यात आले होते. त्यावर पोलिस कारवाई करावी लागली.

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??