विशेष प्रतिनिधी
भीलवाडा : “भीलवाडा पँर्टनचे श्रेय राहुलजींचे नव्हे, सोनियाजी; ते तर येथील जनतेचे आहे, ज्यांनी मोदीजींच्या सर्व सूचनांचे पालन करून कोरोनाला पळवून लावले आहे,” अशा खणखणीत शब्दांत राजस्थानमधील एका महिला सरपंचाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सुनावले आहे. किस्मत गुर्जर असे तिचे नाव आहे.
चीनी व्हायरस कोरोना विरोधातील लढाईत भीलवाडा पँर्टनचा त्या राज्यासह संपूर्ण देशात बराच बोलबाला आहे. खुद्द सोनिया गांधींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विडिओ कॉन्फरन्समध्ये त्याचा उल्लेख करत राहुल गांधींच्या नेतृत्वाला त्याचे श्रेय देऊन टाकले. सोनिया गांधींच राहुलजींचे नाव घेताहेत म्हटल्यावर भीलवाडा पँर्टनच्या यशाबद्दल राहुलजींवर स्तुतिसुमने उधळण्यास काँग्रेसी नेत्यांमध्ये चढाओढ लागली. प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रातही भीलवाडा पँर्टनचा उल्लेख केला.
वरील सर्व प्रकाराचा किस्मत गुजर या सरपंचाला संताप आला त्यांनी एका विडिओद्वारे सोनियाजींनाच खडे बोल सुनावले. यात त्या म्हणतात,
भीलवाड़ा वासियों की मेहनत का श्रेय सोनिया गांधी जी द्वारा राहुल गांधी जी को दिया जाना दुःखद हैं। pic.twitter.com/B9tSu52h2e
— Sarpanch Kismat Gurjar (@SarpanchOnline) April 11, 2020
“गेल्या काही दिवसांमध्ये भीलवाडा पँर्टनचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. हे खेदजनक आहे. पण त्याहीपेक्षा मला जास्त दु:ख तेव्हा वाटले की भीलवाडा पँर्टनचे श्रेय राहुलजींनाही द्यायला सुरवात झाली. वास्तविक याचे श्रेय शेतकरी, युवक, महिला आणि सारी जनता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यांनी सांगितलेल्या सोशल डिस्टंसिंग बरोबरच साफसफाईवर लक्ष दिले. छोट्या छोट्या गोष्टी पाळून सर्वांनी संयम दाखविला. तपासणी, चाचणी, क्वारंटाइन यात जनतेने वैद्यकीय स्टाफला सर्वांनी सहकार्य केले. आम्हाला प्रशासनाचीही साथ मिळाली परिणामी एका डॉक्टरपासून संक्रमित झालेला कोरोना २७ जणांपर्यंत पोचला पण तेथेच त्याला रोखण्यात यश आले.”
या सर्व यशाचे श्रेय मोदींच्या प्रेरणेतून लॉकडाऊनच्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणाऱ्या भीलवाडाच्या जनतेला असल्याचे किस्मत गुर्जर यांनी अधोरेखित केले.
भीलवाडात एका डॉक्टरला संसर्ग झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या २७ जणांपर्यंत तो पोचला परंतु प्रभावी उपाययोजनांनी तो आटोक्यात राहिला आहे. म्हणून त्याच्या श्रेयावरून वाद निर्माण झाला आहे.