प्रतिनिधी प्रतिनिधी
पुणे : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतरही 135 कोटी लोकसंख्येच्या भारतात अद्याप या विषाणूचा उद्रेक झालेला आढळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनला संपूर्ण देश सहकार्य करत असल्याचा हा परिणाम. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन मोदींनी केले आणि सगळा देश क्षणात घरबंद झाला. परंतु हे व्यापक समाजहित मुठभर मुस्लीम लक्षात न घेता धर्म हट्टापायी अजूनही नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.
संपूर्ण समाज जात, धर्म, भाषा, प्रांत आदी सगळे भेद बाजूला ठेऊन घरात बसला असताना काही मुस्लीमांनी जमावबंदी आणि संचारबंदीला न जुमानण्याचे ठरवले आहे. नमाजासाठी एकत्र येण्याचा परिपाठ त्यांनी कायम ठेवला आहे. पिंपरीतल्या एका इमारतीच्या गच्चीत सुमारे पन्नास मुस्लीमांनी एकत्र येत नमाज अदा केली. या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना अटक केली आहे. तर इतर 20 ते 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्लाच्या परवानगीशिवाय कोरोना विषाणू काही करु शकत नाही, या धर्मांधतेतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पिंपरी परिसरातील चिखली भागात नमाजासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी सुरवातीला समाजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना दाद दिली गेली नाही. अखेरीस पोलिसांनी समीना सराईतुल्ला वारीसअली चौधरी, अकबाल हाकीबुल्ला खान, सलीम झीनत चौधरी, महंमद शकील महमद खलील चौधरी, कमल हयातुल्ला रहमाणी, शमशुद्दीन महंमद इलाके खाल, नशीबउल्ला महंमद जमा, अफजल अमीरउल्ला चौधरी, अहमद हुसेन समीउल्ला चौधरी, मोहमद साकीर समीना सराईतुल्ला चौधरी, बिलाल महंमद शकील चौधरी, सोएल महंमद शकील चौधरी, जैनुद्दीन शमशुद्दीन खान आदी आरोपींना अटक केली आहे. यांच्यासह त्यांच्या 20 ते 25 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष बिभीषन सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात या संबंधीची फिर्याद दिली आहे.
युरोप-अमेरिकेतल्या प्रगत देशांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे या देशांमध्ये मृत्यूचेही प्रमाण लक्षणीय आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार सार्वजनिक धार्मिक स्थळावर पूजाअर्चा, प्रार्थना करण्यास, एकत्र येण्यास मनाई करणारे आदेश काढण्यात आले आहेत. असे असूनही आरोपींनी कायद्याला न जुमानता गर्दी केली. यातून कोरोनाचा इतरांना संसर्ग होण्याची भीती असतानाही या मुठभर मुस्लीमांनी शासनाच्या विविध आदेशांचे उल्लंघन केले. त्यामुळे आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, साथरोग प्रतिबंध अधिनियम कलम 3 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 57 प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.