केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉम वापरण्यास सरकारी अधिकार्यांना बंदी केली आहे. हा मंच सरकारी कामासाठी नाही,असे गृह मंत्रालयाने काढलेल्या सुचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने झूम मिटिंग प्लॅटफॉम वापरण्यास सरकारी अधिकार्याना बंदी केली आहे. हा मंच सरकारी कामासाठी नाही,असे गृह मंत्रालयाने काढलेल्या सुचनावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर समन्वय केंद्राने सूचनावली जारी केली आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद चमूने याआधी जारी केलेल्या सुचनावलीचा संदर्भ देत झूम हा सुरक्षित मंच नसल्याचे म्हटले आहे. खाजगी वापरासाठी अद्यापही या मंचाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
झूम कॉन्फरन्स रूममधे अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी आणि या कॉन्फरन्समधे सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या टर्मिनलवर अनधिकृत सहभागी व्यक्तीकडून दुर्भावनेने अटॅक रोखणे हा या सूचनावलीचा उद्देश आहे. व्यक्तींनी घ्यायच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत तपशीलवार माहिती देणारी लिंकही दिली आहे.