देशात चीनी व्हायरसचा उद्रेक अद्यापही चालू आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशेचा किरण दाखवित सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात चीनी व्हायरसचा उद्रेक अद्यापही चालू आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आशेचा किरण दाखवित सप्टेंबरपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सुरू होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
हरदीप सिंग पुरी शनिवारी फेसबुक लाईव्ह दरम्यान नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबरपूर्वीच आम्ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करणार आहोत. परंतू, विमान सेवा सुरू करण्यापूर्वी देशातील चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्या तयार आहेत.
पुरी म्हणाले की, आतापर्यंत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत 25 हजार 465 भारतीयांना मायदेशात आणण्यात आले. मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा आकडा 50 हजारांच्या आसपास पोहचेल. लॉकडाउनदरम्यान भारतातून 8 हजार लोकांना परदेशात पोहचवण्यात आले.
पुरी यांनी 20 मे रोजी ट्वीट करुन 25 मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याबाबत माहिती दिली होती. 21 मे रोजी याची डिटेल गाइडलाइंस जारी करण्यात आली होती. यासाठी 8 विमान कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे. 25 मे पासून 33 टक्के फ्लाइट सुरू होतील, चांगली बुकिंग झाली.
पुरी म्हणाले, 25 मे पासून 33% देशांतर्गत विमाने सुरू होणार आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी जवळपास सर्व तिकीटांचे बुकींग झाले आहे. लॉकडाउनदरम्यान मंत्रालयाने लाइफ लाइन उड्डाने सुरू केली होती. या मार्फत एक हजार टन मेडिकल उपकरणे आणि इत्यादी महत्वाच्या सेवांचा पुरवठा करण्यात आला.