विशेष प्रतिनिधी
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज कानीकपाळी ओरडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन देशाला करीत आहेत. देशातले 90 टक्क्यांपेक्षा जास्त जबाबदार नागरिक त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही देत आहेत. मात्र मोदींच्याच पक्षाचे कार्यकर्ते मोदींच्या आवाहनाला हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊनच्या काळात स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी करण्याची हुक्की पनवेलमधल्या भाजपा नगरसेवकाला आली. या बद्दल संबंधित नगरसेवक आणि इतर अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचार बंदी सुरु असताना मित्रमंडळींसह पार्टी करणे जड गेलेल्या हे भाजप नगरसेवक आहेत पनवेलमधील अजय बहिरा. पनवेल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक बहिरा यांच्या वाढदिवसाला जमून मजा करणार्या इतर 11 लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.