देशाची गरज भागवून व्हायरसच्या प्रादुर्भावावर संजीवनीसारख्या ठरणार्या या गोळ्या मित्रदेशांना देण्याची तयारी भारताने केली आहे. भारताच्या या उदारपणासाठी कृतज्ञता म्हणून अमेरिकेने २९ लाख डॉलर्सची मदत दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : चीनी व्हायरसमुळे आलेल्य संकटकाळातही भारत संपूर्ण जगाला मानवता आणि करुणेचे दर्शन घडवित आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यापासून ते विविध मित्र देश हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधी गोळ्यांचे दान भारताकडून मागत आहेत. देशाची गरज भागवून व्हायरसच्या प्रादुर्भावावर संजीवनीसारख्या ठरणार्या या गोळ्या मित्रदेशांना देण्याची तयारी भारताने केली आहे. भारताच्या या उदारपणासाठी कृतज्ञता म्हणून अमेरिकेने २९ लाख डॉलर्सची मदत दिली आहे.
ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून मलेरियावरील औषध म्हणून वापरल्या जाणार्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांची मागणी केली होती. वैयक्तिक आपल्यालाही या गोळ्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी भावनाविवश होऊन सांगितले होते. ‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार मित्र देशांना या गोळ्या पुरविण्याची भारताने तयारी दर्शविली आहे. सध्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. येथीलअनेक कंपन्या या गोळ्या तयार करतात. त्यामुळे देशाची गरज पूर्ण होऊनही या गोळ्या शिल्लक राहणार आहेत.
देशात चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यावर २५ मार्च रोजी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरीन ट्रेड यांनी औषथांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता ही बंदी काही ठराविक देशांसाठी मागे घ्यावी लागणार आहे. संकटाच्या या काळात जागतिक बंधुभावाचे उदाहरण म्हणून या गोळ्या अमेरिका आणि सार्क देशांना देण्याची तयारी करण्यात आली आहे.