विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिव्याळ तोंडाचा अभिनेता एजाज खानने फेसबुक लाइव्ह करून भाजपला आणि न्यूज अँकरना शिव्याशाप दिले आहेत. चीनी व्हायरसच्या फैलावाचे निमित्त करून भाजप आणि त्यांचे पेड न्यूज अँकर्स मुसलमानांविरोधात भावना भडकवत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे सरकार बदनाम करण्यासाठी भाजपने कारस्थान केले आहे, असे एजाज खान फेसबुक लाइव्ह विडिओमधून बरळला आहे.
एवढ्यावरच एजाज खान थांबलेला नाही. त्याने अर्णव गोस्वामी, रजत शर्मा, सुधीर चौधरी,रूबिया लियाकत या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या न्यूज अँकर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना व्हायरसची लागण होवो, असे शिव्याशापही दिले आहेत. अर्थात यावरून नेटीझन्सची त्याला चांगलाच सटकवला आहे. त्याच्या अटकेची मागणीही केली आहे.
वांद्रा येथील गर्दी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच जमविण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव होता, असेही एजाज खान बरळला आहे. भाजपच्या बाजूने रिपोर्टिंग करणाऱ्या मीडियावर एजाज थुंकलाही आहे.
एजाजचे असले बरळणे हे काही पहिले उदाहरण नाही. यापूर्वी त्याने अनेकदा hate speech दिली आहेत. राज्य घटनेच्या आधारे नाही तर कुराणाच्या आधारे देश चालविण्याचा दावा त्याने केला आहे. एक दिवस सारे जग इस्लाममय होईल, अशी धमकी त्याने अभिनेत्री पायल रोहतगीला दिली होती.
अमली पदार्थ बाळगल्याबद्दल आणि हेअर स्टायलिस्टला अश्लील मेसेज पाठविल्याबद्दल एजाज खानला दोनदा पोलिसांनी अटकही केली होती.