• Download App
    शिवसेनेच्या खासदारांनी मोदींकडे घेतली धाव; सिंगापुरमधले भारतीय चार तासात विमानात | The Focus India

    शिवसेनेच्या खासदारांनी मोदींकडे घेतली धाव; सिंगापुरमधले भारतीय चार तासात विमानात

    • ‘राष्ट्रवादी’च्या बड्या नेत्याचा मुलगाही होता विमानात

    विशेष प्रतिनिधी
    नवी दिल्ली : दोन लाख भारतीय जगभरातल्या अनेक देशांमध्ये अडकले आहेत. कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रत्येकालाच मायदेशी परतायचे आहे. प्रत्येक भारतीयाला जितक्या लवकर मायदेशी आणता येईल, तितक्या लवकर ते शक्य व्हावे, यासाठी भारत सरकार जीव तोडून रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. पण त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत कोणी पोहोचले तर काय होते, याचा दाखला शिवसेनेच्या खासदारांना मिळाला. राजकीय हेवेदावे कर्तव्याच्या आड येऊ न देण्याच्या पंतप्रधान मोदींकडून आलेल्या अनुभवामुळे शिवसेनेचे खासदार हरखून गेले नसते तरच आश्चर्य.
    ही घटना आहे सिंगापुर बेटावरच्या विमानतळावरची. या विमानतळावर शेकडो भारतीय विद्यार्थी कित्येक तासांपासून भारतात येण्यासाठी ताटकळले होते. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातल्या एका बड्या राजकीय नेत्याचाही मुलगा होता अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर फिलिपाईन्स विमानतळावरील गोंधळ घातला. मात्र एका राज्याचा मुख्यमंत्री परदेशातील राष्ट्रप्रमुखाला कोणत्या नात्याने विनंती करणार, ही राजनैतिक अडचण लक्षात घेऊन ठाकरे यांनी त्यांच्या दिल्लीतील खासदारांकडे हा विषय सोपवला. त्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. पण त्यातून गाडी पुढे सरकेना. तेव्हा शिवसेना खासदारांनी थेट मोदी यांना गाठले आणि चक्रे वेगाने फिरली.
    घडले ते असे – उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्याने राऊत आणि विचारे तातडीने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडे गेले. मात्र जयशंकर गेल्या दोन-तीन दिवसांपासून जगभरातले भारतीय भारतात आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यापुढे फक्त सिंगापूर हा एकच देश नाही. जगभरातले सुमारे दोन लाख भारतीय भारतात परतण्यासाठी जगातल्या पन्नासहून अधिक देशांमधील विमानतळांवर अडकून पडले आहेत. जयशंकर यांनी ही वस्तुस्थिती शिवसेना खासदारांना समजावून सांगितली. दरम्यान, भाजपा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही सिंगापुरातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी तुमच्या आधीपासूनच प्रयत्न चालवले आहेत, हेही शिवसेना खासदारांना समजावण्यात आले. तुम्ही काळजी करु नका. सिंगापुरातील प्रत्येक भारतीयाला आपण परत आणतो आहोत. तोपर्यंत सिंगापुरातील भारतीय दुतावास त्यांची सर्वोतोपरी काळजी घेत आहे, असेही जयशंकर यांनी शिवसेना खासदारांना समजावले.

    सेना समर्थकांचे हास्यास्पद दावे

    मात्र ठाकरेंच्या आदेशामुळे शिवसेना खासदार थांबण्यास तयार नव्हते. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदींकडे तातडीची भेट मागितली. विशेष म्हणजे शिवसेना खासदारांनी यापुर्वी केलेले कमरेखालचे वार लक्षात न ठेवता मोदींनी ती तात्काळ दिलीही. मोदींकडे प्रश्न मांडल्यानंतर मोदींनी जयशंकार यांच्याशी चर्चा केली. हे सगळे घडले रात्री अकरा वाजता. वस्तुस्थिती ऐकल्यावर मोदींनी जयशंकर यांना एकाच वाक्यात सूचना केली ती म्हणजे – ‘‘सिंगापुर विमानतळावरील सर्व भारतीय मला पुढच्या दोन-तीन तासात विमानात बसलेले हवेत.’’ मोदींच्या या आदेशवजा सूचनेनंतर जयशंकर यांनी त्यांचे सारे परराष्ट्र नितीकौशल्य पणाला लावले…आणि खरोखरच मोदींच्या सूचनेप्रमाणे पहाटे तीन वाजता सिंगापुर विमानतळावरील सर्व भारतीय भारताकडे झेपावणाºया विमानात बसले होते. 
    अर्थात पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर किंवा खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यापैकी कोणीच याची सोशल मीडियातून टिमकी वाजवली नाही. कारण परराष्ट्र धोरण हा केंद्राचा विषय असल्याने केवळ कर्तव्यपुर्ती केल्याचे समाधान बाळगत ही सर्व मंडळी परदेशात अडकलेल्या इतर भारतीयांच्या मदतीसाठी काम करण्यात मग्न झाली. तिकडे मुंबईत मात्र शिवसेना समर्थकांनी उद्धव ठाकरे यांनी सिंगापुरशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची सुटका केल्याचे सांगत ‘करुन दाखवले’ची पोस्टरबाजी सोशल मीडियात सुरु केली. परराष्ट्र धोरण हा विषय राज्याच्या अखत्यारीत येत नाही. इतर देशातले राजनैतिक अधिकारी किंवा इतर राष्ट्रांचे प्रमुख कोणत्याही राज्याच्या प्रमुखाशी थेट संवाद साधत नसतात, याची जाणीव असलेल्या नेटकºयांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, सिंगापुरातल्या विमानतळावर अडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या कोणत्या बड्या नेत्याच्या मुलासाठी शिवसेना इतकी प्रयत्न करत होती, याचेही कुतूहल सोशल मीडियात ओसंडून वाहात आहे. इतर सर्वसामान्यांच्या परिवारासाठीही शिवसेना खासदार याच पद्धतीने मोदींचे उंबरे झिजवतील का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??