• Download App
    व्हायरसविरुध्द लढाईच्या धामधुमीतही पंतप्रधान वाढतवताहेत सामान्यांची उमेद | The Focus India

    व्हायरसविरुध्द लढाईच्या धामधुमीतही पंतप्रधान वाढतवताहेत सामान्यांची उमेद

    सध्या संपूर्ण देश चीनी व्हायरसविरुध्दची लढाई लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. मात्र, या सगळ्या धामधुमीतही सामान्य माणसाची उमेद कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. व्हायरसविरुध्द लढताना असामान्य कामगिरी करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर आणत आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देश चीनी व्हायरसविरुध्दची लढाई लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर दिवसाचे २४ तासही कमी पडत आहेत. मात्र, या सगळ्या धामधुमीतही सामान्य माणसाची उमेद कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. व्हायरसविरुध्द लढताना असामान्य कामगिरी करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर आणत आहेत.

    पंतप्रधानांनी एका ७४ वर्षीय आजोबांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. आपल्या पेन्शनच्या पैशातून मास्क तयार करून लोकांना वाटत आहेत. पीआयबी जम्मू काश्मीरनं एक त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर पंतप्रधानांनीही त्यांचे कौतुक केले. पीआयबीनं त्यांना करोना वॉरिअर असं संबोधलं आहे. त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतून ६ हजार मास्क तयार करून वाटले आहेत. आता ते या रकमेतून गरजूंना मोफत अन्नधान्याचं वाटपही करत आहेत.

    साईबा आणि साईशा गुप्ता या चिमुकल्या भगिनींनी चीनी व्हायरसविरोधात जनजागृती करणारा एक व्हिडीओ केला आहे. त्याच्यामध्ये व्हायरसविरुध्द लढाईत सामाजिक संपर्क कमी करणे, स्वच्छता ठेवणे कसे गरजेचे आहे, हे सांगितले आहे. या दोन बहिणींचा आपल्याला अभिमान वाटतो, असे म्हणत पंतप्रधानांनी त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतातील कबड्डीपटूंनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या आवाहनाचा व्हिडीओ शेअर करत कबड्डीपटूंचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांचे ट्विटरवर जगभरात कोट्यवधी फॉलोअरर्स आहे. त्यांनी ट्विट केल्यावर कोट्यवधी लोकांना उमेद मिळते आणि त्यातून समाजसेवेची साखळी तयार होण्यास मदत होते.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!