सध्याच्या संकटकालीन स्थितीत देशात कुठेही वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा कमी पडू नये यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कंबर कसली आहे. देशात कुठूनही, कुठेही औषधे, वैद्यकीय उपकरणे आदी जलद पोहोचवण्यासाठी ‘एअरलिफ्ट’ करणारे वैमानिक दुर्गम भागात विमाने घेऊन पोहोचत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणत्याही राज्यात, शहरात वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा कमी पडू नये यासाठी एअरलिफ्ट करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय तयार झाले आहे.
वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासू नये यासाठी वैद्यकीय सामुग्रीाचा पुरवठा विमानाने केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून कार्गो विमानसेवा सुरू ठेवली जाणार आहे.
कोविड -19 ची चाचणी आणि या रोगापासून संरक्षणासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि अन्य संबंधित सामुग्रीच्या पुरवठ्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. विविध राज्यांकडून मागणी झालेल्या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आवश्यक सामग्री पुरविण्यासाठी संबंधित पुरवठा संस्थांशी समन्वय साधत आहेत.
देशभरात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया आणि अलायन्स एअरची विमानसेवा सुरु ठेवण्यात आली आहे. या विमानांमधून माल वाहतूक करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिकृत केलेल्या एजन्सी त्यांच्या प्रदेशातील संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे वेळेवर ही सामुग्री पोहोचणे शक्य होणार आहे.
देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, एलायन्स एअरने 29 मार्च 2020 रोजी दिल्ली- कोलकाता मार्गावर विमानसेवा चालवून कोलकाता, गुवाहाटी, दिब्रूगढ आणि अगरतलासाठी सामुग्रीची वाहतूक केली. भारतीय नौदलाच्या विमानाने उत्तर भागात, दिल्ली- चंदीगड- लेह दरम्यान विमानसेवेद्वारे आयसीएमआर व्हीटीएम किट आणि अन्य आवश्यक वस्तू पुरवल्या आहेत.अलायन्स एअरने एअर इंडियाच्या विमानातून पुण्यासाठी आवश्यक सामुग्री मुंबईला पाठवली आहे. मुंबई-दिल्ली-हैदराबाद-चेन्नई-