• Download App
    विप्रोकडून पुण्यात ४५० खाटांचे रुग्णालय | The Focus India

    विप्रोकडून पुण्यात ४५० खाटांचे रुग्णालय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुण्यात साडे चारशे खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

    यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच विप्रोने महाराष्ट्र सरकारसमवेत केला आहे. कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवाडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.

    महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

    या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल.”

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!