Thursday, 1 May 2025
  • Download App
    विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार | The Focus India

    विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : “फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत, अशांवर पोलीसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  

    कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन, नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही पवार यांनी केले.

    जनजागृती वाढावी- बाळासाहेब थोरात

    जनजागृती वाढल्यास या विषाणुविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणुचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी लोक मर्यादित स्वरूपात एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करावे. “सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात, ई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे,” असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

    Related posts

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Pahalgam attack : पाकिस्तानचा खरा सूड उगवणारे निर्णयकर्ते कामात मग्न; पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!

    जसा आजोबा, तसाच नातू; दोघांच्याही धमक्या तद्दन फालतू!!