गेल्या काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यासाठी खोटे व्हिडीओ बनविले जात आहेत. असाच एक व्हिडीओ वाराणसीतील असल्याचे सांगून मुस्लिम समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वृत्तसंस्था
लखनऊ : गेल्या काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यासाठी खोटे व्हिडीओ बनविले जात आहेत. असाच एक व्हिडीओ वाराणसीतील असल्याचे सांगून मुस्लिम समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या व्हिडीओमध्ये एका मुलाला पोलीसांकडून मारहाण होता दाखविले आहे. त्या व्हिडीओखाली लिहिले आहे की भारतीय मुस्लिम संकटात सापडला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे. याठिकाणी मुलांना मशीद आणि शाळेतून बाहेर काढून मारले जात आहे. संपूर्ण जगाने बघावे की भारतामध्ये काय चालले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी आहे. त्यामुळे खोडसाळपणे हा व्हिडीओ तयार करून टाकण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाही त्यातून लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, हा व्हिडीओ फेक असल्याचे पुढे आले आहे.