विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंग बिश्त यांचे आज किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र योगी त्यावेळी उपस्थित राहणार नाहीत.
खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्विटवरून ही माहिती दिली. वडिलांच्या शेवटच्या क्षणी मी उपस्थित राहणे गरजेचे परंतु, राज्यात कोरोना लॉकडाऊन आहे. कामेही भरपूर आहेत. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. अंत्यसंस्कारांच्या वेळी सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहनही योगींनी आपल्या नातेवाइकांना केले आहे.
देशातील नेते लॉकडाऊन काळातही वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करत असताना, माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या लग्नात सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला असताना योगी आदित्यनाथ हे वेगळे उदाहरण घालून देत आहेत.
पूज्य पिताजी के कैलाशवासी होने पर मुझे भारी दुःख एवं शोक है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) April 20, 2020
वह मेरे पूर्वाश्रम के जन्मदाता हैं।
जीवन में ईमानदारी, कठोर परिश्रम एवं नि:स्वार्थ भाव से लोक मंगल के लिए समर्पित भाव के साथ कार्य करने का संस्कार बचपन में उन्होंने मुझे दिया।
आनंदसिंग बिश्त यांचे पार्थिव उत्तराखंड येथील पौरी गावी नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर योगी स्वत:च्या घरी जाऊन वडिलांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
बिश्त यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, देवेंद्र फडणवीस, कमलनाथ आदी नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.