विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही वाढविण्यात येईल. किंवा सरकार आणीबाणी जाहीर करेल, अशा “फेक न्यूज” सोशल मीडियावर पसविण्यात येत आहेत. या बातम्या खोट्या आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही, असा खुलासा सरकारी मीडिया प्रसार भारती न्यूज सर्विसने केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांच्या हवाल्याने वरील खुलासा करण्यात आला आहे. सरकार एप्रिलच्या मध्यात आणीबाणी जाहीर करणार असल्याने प्रशासनाच्या मदतीसाठी माजी सैनिक, एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी यांची भरती करण्यात येत असलेल्या फेक न्यूज पसरत असल्याचे प्रसार भारतीने खुलाशात नमूद केले आहे. भरतीच्या बातम्या खोट्या आहेत. भरतीच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा सैन्य दलांकडूनही करण्यात आला.