• Download App
    लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना आकड्यांनी उत्तर; रुग्ण दुप्पट होण्याचा वेग झाला २० दिवसांचा | The Focus India

    लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना आकड्यांनी उत्तर; रुग्ण दुप्पट होण्याचा वेग झाला २० दिवसांचा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. कॉँग्रेस आणि खासदार राहूल गांधी यांनी तर यासाठी पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका केली. मात्र, लॉकडाऊनमुळे देशात चीनी व्हायरसला रोखण्यात रोखण्यात यश मिळाले आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग २० दिवसांपर्यंत खाली आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. कॉंग्रेस आणि खासदार राहूल गांधी यांनी तर यासाठी पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका केली. मात्र, लॉकडाऊनमुळे देशात चीनी व्हायरसला रोखण्यात रोखण्यात यश मिळाले आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग २० दिवसांचा झाला आहे.

    आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार देशातील 7 राज्यांत चीनी विषाणू संक्रमण दुप्पट होण्याचा वेग 11 वरुन 20 दिवसांचा झाला आहे. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिसा, राजस्थान, तमिळनाडू आणि पंजाब यांचा समावेश आहे. पाच राज्यांमध्ये तर 40 दिवसात संक्रमितांचा आकडा दुप्पट झाला आहे. यात कर्नाटक, लडाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळ सामील आहे. असाम, तेलंगाणा आणि छत्तीसगड या राज्यांत ४० दिवसांपेक्षाही जास्त काळानंतर रुग्ण दुप्पट होत आहेत. सुरूवातीला संक्रमित होण्याचा वेग 4.2 दिवसांचाच होता.

    आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 8 हजार 324 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट 25.19 टक्के झाला आहे. 14 दिवसांपूर्वी हा 13.06 टक्के होता. मृत्यूदरदेखील इतर देशांपेक्षा कमी आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 0.33 टक्के वेंटीलेटर पर आहेत. दीड टक्के टक्के रुग्ण ऑक्सीजन सपोर्ट आणि 2.34 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. एकूण संक्रमितांचा मृत्यूदर 3.2 टक्के आहे.

    देशात रोज 49 हजार चाचण्या होत आहेत. 288 सरकारी प्रयोगशाळा 97 खासगी लॅबसोबत मिळून काम करत आहेत. 16 हजार कलेक्शन सेंटरवर सँपल गोळा केले जात आहेत. पुढील काही दिवसात आम्ही आमच्या दररोजच्या चाचण्या एक लाखांवर नेण्यासाठी काम करणार आहोत. कोरोनावर औषध येण्यासाठी सध्या वेळ आहे, त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे हे सर्वांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??