संपूर्ण देश चीनी व्हायरसविरोधात लढत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जीं गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत. अत्यावश्यक सेवांशिवाय दुकाने सुरू आहेत. ऐवढेच नव्हे तर धार्मिक कार्यक्रम आणि मशीदींमध्ये नमाजही सुरू आहेत. यावरून केंद्रीय गहमंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देश चीनी व्हायरसविरोधात लढत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जी गंभीमरपणे घ्यायला तयार नाहीत. अत्यावश्यक सेवांशिवाय दुकाने सुरू आहेत. ऐवढेच नव्हे तर धार्मिक कार्यक्रम आणि मशीदींमध्ये नमाजही सुरू आहेत. यावरून केंद्रीय गहमंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारला आहे.
एनडीटीव्हीने आजच पश्चिम बंगालमधील छिंदवाडा येथे मशीदीत नमाज पढणाºया ४० जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त दिले होते. त्याचबरोबर बंगालमध्ये गरज नसताना अनेक दुकाने सुरू आहेत. राज्य सरकार धार्मिक कार्यक्रमांना परवानगीही देत आहे. त्यामुळे केंद्राने हे पत्र लिहून नाराजी व्यक्त करत जाब विचारला आहे.
बंगालमधील तृणमूल कॉँग्रेसचे नेते मदतीच्या नावाने चमकोगिरी करत आहेत. नेतेच रेशनचे वाटप करत आहेत. भाजी, मच्छी आणि मांस बाजारांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाहीए. या बाजारांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होतंय. पश्चिम बंगालमधील लॉकडाऊनचा परिणाम हळूहळू कमी होत चालला आहे. राज्य सरकारकडून अनेक गोष्टींमध्ये सूट देण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन, किराणा आणि मेडिकल सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही इतर दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत.
कोलकातातील राजा बाजार, नार्केल डांगा, तोपसिया, मेटियाबुर्ज, गार्डेनरीच, इकबालपूर आणि मनिकटाला भागात भाजी, मच्छी आणि मटण मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं सर्रास उल्लंघन होतंय. तिथे नागरिकांची गर्दी होतेय, असं गृहमंत्रालयाने म्हटलंय.