चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचव्या टप्यातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली. या वेळी अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा गोषवारा पंतप्रधानांसमोर मांडला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचव्या टप्यातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली. या वेळी अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा गोषवारा पंतप्रधानांसमोर मांडला.
३१ मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आहे. अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व राज्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मत त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडलं आणि पुढील धोरणावर चर्चा करण्यात आली. राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली असली तरी आर्थिक बाबतीत राज्यांना अधिकची सूट हवी आहे.
आतापर्यंत पंतप्रधान स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. पण पहिल्यांदाच अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि मत जाणून घेतलं. तर सरकारने स्थापन केलेल्या एका गटाने देशात आता लॉकडाऊनची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील ११ शहरांमध्ये ७० टक्कके रुग्ण आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपविण्याबाबत सर्वांचाच विरोध आहे. किमान १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविला जावा, असे मत अनेक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र, यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतरत्र भागात व्यवहार चालू होण्यासाठी निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढला तर अनेक सवलती मिळणार आहे. मात्र, ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे तेथे मात्र निर्बंध आणखी कडक होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालय यामध्ये एक गाईडलाईन तयार करावी. राज्यांनी आपल्या येथील स्थितीनुसार त्यावर अंमलबजावणी करावी, असाही विचार करण्यात आलेला आहे.