- कुमारस्वामींचा मुलगा, कॉंग्रेसनेत्यांची भाची
- सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैैशी
चीनी व्हायरसच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. बंगळुरु रेड झोनमध्ये असल्याने ग्रीन झोनमधील रामनगर येथील फार्महाऊसवर लग्न केल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. मात्र, याठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐशी-तैशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियातून या लग्नाची चर्चा वाढल्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी चौकशीचे दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरु : चीनी व्हायरसच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. बंगळुरु रेड झोनमध्ये असल्याने ग्रीन झोनमधील रामनगर येथील फार्महाऊसवर हे लग्न लावल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. मात्र, याठिकाणीही सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याच्या तक्रारी आल्या. शिवाय, रेड झोनमधून ग्रीन झोन असलेल्या भागात येण्याची परवानगी कशी आणि कोणाकडून मिळाली, असाही प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी दिले आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्या या विवाहाला दोन्ही बाजूच्या उच्चपदस्थांची गर्दी होती. कारण वधूच्या बाजुलाही बडे राजकीय कुटुंब होते. निखील कुमारस्वामी यांची वधू ही काँग्रेसचे माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती आहे. बंगळुरातील कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी विवाह सोहळा झाला. त्यासाठी गुुरुवारपासून जोरदार तयारी आणि धार्मिक कार्यक्रम सुरु होते.
निखिल हा अभिनेता असून शुक्रवारी (17 एप्रिल) मुहूर्तावर त्याचे लग्न रेवतीसोबत करण्याचे आधीपासूनच ठरलं होतं. आम्हाला धुमधडाक्यात लग्न करायचं होते, तुम्हा सर्वांना आमंत्रण द्यायचं होतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला ठरलेल्या दिवशीच छोटेखानी विवाह सोहळा आखणे भाग आहे, असं म्हणत कुमारस्वामी यांनी पाहुण्यांची माफी मागितली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना विवाहस्थळी भेट न देण्याचे आवाहन केले. घरुनच वधू-वरांना आशीर्वाद देण्याचं आवाहन कुमारस्वामी यांनी केल. बंगळुरु हे रेड झोनमध्ये येत असल्यामुळे रामनगर या ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या भागातील फार्म हाऊसवर लग्न झाले. पडलं. 12-13 डॉक्टरांसोबत बोलून लग्नसोहळा आयोजित केल्याचे कुमारस्वामी म्हणाले आहेत. मात्र, लग्नाच्या फोटोमध्येच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र दिसत आहे.