• Download App
    लाऊडस्पीकरवरून अजान, काँग्रेसच्या माजी कायदामंत्र्यांना न्यायालयाने फटकारले | The Focus India

    लाऊडस्पीकरवरून अजान, काँग्रेसच्या माजी कायदामंत्र्यांना न्यायालयाने फटकारले

    मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान देण्याची मागणी करणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांना न्यायालयाने फटकारले आहे. मशिदीमध्ये अजानला परवानगी आहे, मात्र लाऊडस्पीकर हा धर्माचा भाग असू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या वापराला मज्जाव केला आहे.


    वृत्तसंस्था

    अलाहाबाद : मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजान देण्याची मागणी करणारे कॉंग्रेसचे माजी  केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांना न्यायालयाने फटकारले आहे. मशीदीमध्ये अजानला परवानगी आहे, मात्र लाऊडस्पीकर हा धर्माचा भाग असू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या वापराला मज्जाव केला आहे.

    न्यायाधीश शशिकांत गुप्ता आणि अजित कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला दिलासा देताना सांगितलं आहे की, अजान हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग असू शकतो पण लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा धमार्चा भाग असू शकत नाही.

    न्यायालयात करण्यात आलेल्या काही याचिकांवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने हा निर्णय दिला. याबाबत माजी केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद, लोकसभा खासदार अफजल अन्सारी यांनी याचिका दाखल केली होती.

    गाजीपूरमधील लोकांच्या धार्मिक अधिकारांचा रक्षण केलं जावं तसंच राज्य सरकारला मशिदींचा सांभाळ करणार्या व्यक्तीकडून अजान करण्याची परवानगी दिली जावी अशी याचिका केली होती. न्यायालयाने अजान करण्यास परवानगी दिली आहे, मात्र त्यावेळी लाऊडस्पीकर किंवा इतर यंत्राचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

    लाउडस्पीकरवर अजान लावल्यामुळे इतरांना त्रास होतो, हे बंद करायला हवे असे वक्तव्य केल्याने प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी केले होते. त्यांच्यावर कट्टरपंथियांनी टीका केली होती.  सर्व इस्लामिक विद्वान ज्यांनी 50 वर्षे लाउडस्पीकरला हराम घोषित केले होते, ते सर्व चूक होते, असे  हिम्मत असेल तर बोलून दाखवा. नंतर मी तुम्हाला त्या सर्व इस्लामिक विद्वानांचे नाव सांगेल, असा इशाराही अख्तर यांनी दिला होता.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…