• Download App
    "रेडझोन" मालेगावात सीआरपीएफ दाखल; दोन कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा | The Focus India

    “रेडझोन” मालेगावात सीआरपीएफ दाखल; दोन कोरोनाग्रस्त महिलांचा मृत्यू; अहवालाची प्रतीक्षा

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव  :  शहरात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात करोना विषाणू आजाराची लक्षणे असणाऱ्या दोन महिलांचा काल रविवार दि.१२ रोजी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोघा महिलांचे घशाचे श्राव तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. यानंतरच त्यांना करोना लागण झाली आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे

    येथील सामान्य रुग्णालयात नांदगाव तालुक्यातील ४८ वर्षीय महिला शनिवार रोजी रविवार रोजी मालेगाव येथील ५८ वर्षीय महिला या दोन्हींना सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या महिलांचे घष्याचे श्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून त्यांच्यावर आयसोलेशन वार्डात उपचार करण्यात येत होते. मात्र अहवाल येण्याआधीच या दोन्ही महिला दगावल्या आहेत. या दोन्हीं महिला डायबेटीसच्या रूग्ण होत्या. तसेच त्यांना दम लागणे अशी करोना सदृश्य लक्षणे दिसत होती. त्यांचा मृत्यू करोनामुळे झाला कि अन्य कारणामुळे हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. रुग्णालय प्रशासनाने सर्व खबरदारी घेऊन त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे स्वाधीन करीत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.

    Related posts

    Devendra Fadnavis : फडणवीसांची पवारांशी तुलना हा त्यांचा सन्मान??… की…

    माणिकराव कोकाटे यांच्यावर अर्धीच कारवाई??, मंत्रिपद नाही तर फक्त कृषी खाते काढणार??

    जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांना सत्यपाल मलिकांची झाली आठवण; पण कुणालाही नाही आठवले मधू लिमये!!