पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनी व्हायरसविरुध्दच्या लढ्यात आपल्या वक्तव्यांनी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी सातत्याने अडथळे निर्माण करत आहेत. मात्र, आता त्यांना उपरती झाली असून या संकटाचा सामना करण्यासाठी भेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनी व्हायरसविरुध्दच्या लढ्यात आपल्या वक्तव्यांनी कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी सातत्याने अडथळे निर्माण करत आहेत. मात्र, आता त्यांना उपरती झाली असून या संकटाचा सामना करण्यासाठी भेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या राष्ट्रध्वजाच्या फोटोसह एक ट्विट केले आहे. सध्या देश कोरोना नावाच्या कठीण संकटातून जातो आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला देशाला बंधूभाव, करुणाभाव आणि माणुसकीची किंमत ही मोठ्या प्रमाणावर समजते आहे.
भारताचा आत्मा अखंड आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवली तर या महामारीवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी देशाने एकत्र यायला हवे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. यासाठी त्यांनी रविवारी माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
देशाची एकजूट दाखवून देण्यासाठी पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता, नऊ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करा आणि दिवे लावा असे आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र यावरही राहुल गांधी यांनी टीका केली होती. टाळ्या वाजवून आणि दिवे पेटवून करोना दूर होणार नाही अशी टीका राहुल गांधी यांनी म्हटलं होते. मात्र, आता त्यांनी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. नेटकर्यांनी यावरून राहूल गांधी यांना चांगलेच घेरले आहे. पंतप्रधानांच्या कार्यात सहभागी व्हा. तुमचे राजकारण नंतर कधीतरी पाहा, असे त्यांना सुनावले जात आहे.