पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण यावेळी चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे राहुल गांधी गुरूवारी म्हणाले. कदाचित पहिल्यांदाच देशातील सामान्य जनतेने त्यांचे कौतुक केले आहे. पण एका बाजुला पंतप्रधान देशातील जनतेचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत असताना राहूल गांधी जनतेत धास्ती निर्माण करत आहेत, अशी टीकाही होत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण यावेळी चीनी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे राहुल गांधी गुरूवारी म्हणाले. कदाचित पहिल्यांदाच देशातील सामान्य जनतेने त्यांचे कौतुक केले आहे. पण एका बाजुला पंतप्रधान देशातील जनतेचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत असताना राहूल गांधी जनतेत धास्ती निर्माण करत आहेत, अशी टीकाही होत आहे.
राहूल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदींशी मतभेद असतील पण व्हायरस विरोधात एकत्र येऊ, असे सांगितले.
परिस्थितीने गंभीर पल्ला गाठला आहे. अशात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायला हवा. या कठिण परिस्थितीत सरकार आणि प्रशासनासह सर्वांनी एका स्ट्रटेजीप्रमाणे काम करायला हवे, असेही राहूल गांधी म्हणाले. त्यावरही कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, संपूर्ण जग भारताने वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेऊन व्हायरस बाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले असे म्हणत असताना त्यावरच राहूल गांधी यांचे आक्षेप घेणे अनेकांना आवडलेले नाही.
लॉकडाउनमुळे अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे समस्या केवळ पुढे ढकलली गेली. लॉकडाउनमुळे कोरोना थांबणार नाही. लॉकडाउन हे केवळ एका पॉज बटण सारखे आहे. लॉकडाउन उघडताच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. व्हायरस आपले काम पुन्हा सुरू करेल असे राहुल गांधी म्हणाले. यावर एकाने तर ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या म्हणीचा आधार घेत ‘शुभ बोल नाऱ्या’ असा सल्ला राहूल गांधी यांना दिला आहे.