विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळमधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या पत्रकार परिषदांना थेट सामोरे जाण्याचा पर्दाफाश शीला भट या महिला पत्रकाराने केला आहे.
राहुल गांधी गेले काही दिवस पत्रकार परिषदा घेत आहेत. अर्थशास्त्रींशी चर्चा करत आहेत. त्याच्या बातम्या मीडियात येत आहेत. याचे कौतूक राजदीप सरदेसाईंनी केले. राहुल गांधी वरिष्ठ आणि तरूण पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांना थेट सामोरे जात आहेत.
सडेतोड उत्तरे देत आहेत. त्यांची पत्रकार परिषद scripted नसते, असे कौतुकाचे ट्विट सरदेसाईंनी केले. यात राहुल यांच्या स्तुतीबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर छुपी टीकाही होती. मोदी पत्रकार परिषदा घेत नाहीत. पत्रकारांनी जाहीरपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. selected पत्रकारांना selected वेळेत भेटतात, असे सरदेसाईंना सूचित करायचे होते.
राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा हा make over चा प्रयत्न आहे, असे काँग्रेसच्याच गोटातून सांगितले जात आहे. पण सरदेसाईंचे ट्विट आणि राहुल गांधींचे make over हे दोन्ही मुद्दे शीला भटने खोडून काढले. ती राहुल गांधींच्या पत्रकार परिषदांना हजर होती. राहुल अजिबात पत्रकारांच्या प्रश्नांना थेट सामोरे जात नव्हते. पत्रकारांकडून आधी प्रश्न लिहून घेतले जात होते.
रणदीप सुरजेवाला या प्रश्नांची छाननी करून मगचे राहुल गांधी यांच्याकडे देत होते. लिहून न दिलेले प्रश्न विचारू देत नव्हते, असा खुलासाच शीला भटने तिच्या ट्विटमध्ये केला आहे.
शीलाच्या एका ट्विटमुळे राहुल गांधींचे पत्रकार परिषदेचे बिंग फुटले आणि Re re make over चा make up देखील उतरला.