विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रामानंद सागर यांची मालिका रामायणने जगातली टीआरपीची सगळी वर्ल्ड रेकॉड तोडत नवीन कीर्तीमान स्थापित केले आहे. १६ एप्रिल २०२० या एकाच दिवशी रात्री ९.०० वाजता ७.७ कोटी लोकांनी रामायणाचा एपिसोड बघितला.
त्या दिवशी जगातली टीआरपीची सगळी वर्ल्ड रेकॉर्ड तुटली. टीआरपीची अन्य पाच वर्षांची रेकॉर्ड ही रामायणाने तोडली. चार दिवसांत या मालिकेला १७ कोटी दर्शक मिळाले.
१९८८ मध्ये दूरदर्शनसाठी रामानंद सागर यांनी रामायण या मालिकेची निर्मिती केली होती. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि प्रसार भारतीच्या सीईओंनी या बद्दल आनंद व्यक्त केला आहे.