- लिमोझिन कार खरेदीचा निर्णय राष्ट्रपती कोविंद यांनी पुढे ढकलला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाचा मुकाबला करताना देशाला पैसा प्रचंड लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या नियमित खर्चात कपात केली आहे.
विशेष समारंभासाठी वापरात आणण्याच्या लिमोझीन कार खरेदीचा निर्णय कोविंद यांनी पुढे ढकलला आहे. ही लिमोझिन कार २०२१ च्या प्रजासत्ताक दिनी वापरण्यात येणार होती. त्याच बरोबर at home कार्यक्रम, परदेशी पाहुण्यांच्या थाटाच्या मेजवान्या, राष्ट्रपती भवनातले छोटे मोठे समारंभ एक तर रद्द करण्यात आले आहेत किंवा त्यांच्यात कपात करण्यात आली आहे.
समारंभांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी निमंत्रित पाहुण्यांची संख्या देखील मर्यादित करण्यात आली आहे. तसेच मेजवानीच्या मेन्यूमधील पदार्थांची संख्या कमी करण्यात येऊन विविध समारंभांसाठी लागणारे डेकोरेशन, फुले यांच्या खर्चात कपात करण्यात आली आहे.
कोविंद यांनी २०२० मार्चपासून राष्ट्रपतींच्या पगारात ३०% कपात स्वीकारली आहेच. एक महिन्या पूर्ण पगार पीएम केयर फंडाला दिला आहे. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंग यांनी महिला बचत गटांच्या सहायाने ५००० मास्क बनविले आहेत. त्या स्वत: टेलरिंग मशीनवर काम करत यात सहभागी झाल्या.