केंद्र सरकारकडून चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके पाठविण्यात येत आहेत. मात्र, ही पथके पाठवून केंद्र सरकार राज्य सरकारांवर दादागिरी करत असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारकडून चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके पाठविण्यात येत आहेत. मात्र, ही पथके पाठवून केंद्र सरकार राज्य सरकारांवर दादागिरी करत असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावातून मुक्त झाल्यावर आव्हाड यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी ट्विटवर एक पत्र पाठवून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. चीनी व्हायरसशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारेच लढत आहेत. मोदी सरकार कुठलीही आर्थिक मदत न करता अभ्यास पथके पाठवून राज्य सरकारांवर दादागिरी करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आव्हाड म्हणतात, ‘पंतप्रधान टीव्हीवर येऊन नाट्यमय घोषणा करताहेत. पण प्रत्यक्षात लढाई राज्य सरकारं लढत आहेत. सर्व आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवून राज्य सरकारच्या कामकाजाला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य केंद्रं, जिल्हा परिषदांची रुग्णालयं यांचं भक्कम जाळं असल्यामुळंच आज आपला संघर्ष सुरू आहे. मात्र, आज एक प्रकारचं आर्थिक अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघराज्य पद्धतीचा पाया खिळखिळा करून, संसदीय लोकशाही मोडून अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा डाव दिसू लागला आहे.