विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : देशभर चीनी व्हायरस पसरवून फरार झालेल्या मौलाना महंमद सादला “वाँटेड” म्हणून पोलिसांना माहिती कळविण्याचे आवाहन करणारी पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल करणाऱ्या डॉक्टर विरोधात औरंगाबाद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. डॉ. संभाजी गोविंद चितळे, वय ३८, कॉस्मो हॉस्पिटल, कामगार चौक, सिडको, औरंगाबाद असे संबंधिताचे नाव आहे. त्यांनी मौलाना सादला पोस्टमध्ये वाँटेड टेररिस्ट असे लिहून त्याची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले होते. परंतु, या पोस्टमुळे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ उत्पन्न होण्याचे कारण दाखवून औरंगाबाद पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून डॉ. चितळे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कलम ५०५ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली.
मौलाना महंमद सादला मूळात दिल्ली पोलिसांनी फरार जाहीर केले आहे. तबलिगी जमातच्या २५००० हजार कार्यकर्त्यांची ओळख पटवली आहे. कोरोनाग्रस्तांपैकी ३५% तबलिगी जमातशी संबंधित असल्याचा आरोग्य मंत्रालयाचा आकडा आहे. तबलिगी जमातीचा ऑक्टोपस देशभर पाय फैलावून बसल्याचे पोलिसांनीच उघड केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी तबलिगी जमातशी संबंधित माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डॉक्टरवर मौलाना महंमद सादला वाँटेड टेररिस्ट म्हटल्याबद्दल प्रतिबंधात्मक कारवाईला सामोरे जावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.