• Download App
    मौलाना सादच्या शामलीतील फार्म हाऊसवर ड्रोन कँमेराने नजर | The Focus India

    मौलाना सादच्या शामलीतील फार्म हाऊसवर ड्रोन कँमेराने नजर

    विशेष  प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मौलाना महंमद साद याच्या शामलीमधील फार्म हाऊसवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ड्रोन कँमेराने नजर ठेवली आहे. मौलाना सादने स्वत:ला क्वारंटाइन करून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे परंतु, तो फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण करण्याची नोटीस देखील बजावली आहे. मात्र तो दिल्लीतून निसटून शामली परिसरात येऊ शकतो. हे लक्षात घेऊन पोलिसांनी जाळे लावले आहे. त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी ड्रोन कँमेराने नजर देखील ठेवली आहे. शामलीचे डीजी प्रवीण सिंह यांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याचे सांगितले. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळत आणला असल्याचे स्पष्ट होत आहे.

    दिल्ली पोलिसांनी मौलाना सादला निजामुद्दीन परिसरातील तबलिगी मरकज मधील सर्व व्यवहारांचा तपशील कायदेशीर नोटीस पाठवून मागितला आहे. या नोटिशीत २६ प्रश्न आहेत. यात वैयक्तिक संपत्तीपासून तबलिगी जमातच्या फंडिंगपर्यंत सर्व प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्याएेवजी मौलाना साद फरार झाला आहे.

    Related posts

    29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!

    29 महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, प्रत्यक्षात त्यात अजितदारांचा सहभाग नगण्य; फडणवीस आणि शिंदेच निर्णायक!!

    अंगात काळा स्वेटशर्ट, डोक्याला मुंडासे, हातात कुदळ; मनरेगा श्रमिक संमेलनात गाजले राहुल गांधींचे फोटोशूट!!